मूल:-( येथिल थरारक प्रकार ) आम्हाला गंभीर मारहाण करणारे चावरे दाम्पत्यासह सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी आतिश वाळके यांनी प्रेस क्लब मूलच्या पत्रकार परिषदेत केली. काही दिवसापूर्वी मूल येथील ताडाळा रोडवर वास्तव करणारे सत्यजीत दादाजी वाळके आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला नेत्या अर्चना चावरे यांचे कुटूंबियात वाद निर्माण होवून, मारहाणीची घटना घडली होती. या घटनेची दोनही गटाकडून पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी दोनही गटावर गुन्हे दाखल केले होते. या घटनेची माहीती देण्याकरीता आतिश वाळके यांनी आज पत्रकार परिषद घेवून, पोलिसांनी अर्चना चावरे व त्यांचे सोबतच्या सर्वावर अटकेची कारवाही करावी अशी मागणी केली.
श्री. वाळके यांनी, आपण घटना घडली त्यावेळी दुकानातच होतो, मात्र पोलिसांनी खोट्या तक्रारीवरून आपले विरोधातही गुन्हे दाखल केले. हा गुन्हाही मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.
पोलिसांनी घटनेची वास्तुस्थिती जाणून घेण्याकरीता, अर्चना चावरे यांचे घराचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे अशी मागणी केली.
अर्चना चावरे, त्यांचे पती मार्कंडी चावरे, मुलगा राहूल चावरे, चांदापूरचे उपसरपंच अशोक मार्गनवार यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली, वडिलांना गंभीर मारहाण केली. त्यांचे विरोधात पोलिसांनी अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहे, मात्र त्यांना पोलिसांनी अटक केली नसल्यांने आपल्याला अजूनही धोका असल्यांचा आरोप आतिश वाळके यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेला अजय वासेकर उपस्थित होते.