नागभिड:
संपूर्ण परिसरात पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव येथे पावसाळ्याच्या दिवसात लाखो पर्यटक येतात. मात्र बाहेरून येणारे पर्यटक हे या मुख्य गेट ते तलाव परिसरापर्यंतचा रस्ता याच्या आजूबाजूला व तलाव परिसरामध्ये सोबत आणलेल्या प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक पत्रावळी, प्लास्टिक ग्लास , दारूच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या असा खूप सारा पर्यावरणास व वन्यजीवांच्या करीता हानिकारक असलेला प्लास्टिक कचरा जंगलभर फेकून जातात. यातच या प्लास्टिक कचरा उचलताना तलावाच्या आजूबाजूला काही गणेश मूर्तीचे विसर्जन केल्याचे निदर्शनास आले. मात्र ह्या जंगल परिसर आहे यात बाहेरून उथळ पाण्यात मूर्ति विसर्जन करणे चुकीचे असल्याचे पर्यटना करता आलेल्या पर्यटकांनी मत व्यक्त केली.
मात्र परिसरामध्ये पर्यावरणाकरता झटणारी व पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे काम करणारी ‘स्वाब संस्था’ पर्यावरणात विखुरलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे पर्यावरणाचे व वन्यजीवांचे नुकसान लक्षात घेत. येत्या सात ते आठ वर्षापासून सतत आपल्या परिसरातील जंगल परिसरातील रस्ते, धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ, तलाव, डोंगर परिसर हे त्या परिसरात पडलेला प्लास्टिकचा कचरा गोळा करून स्वच्छ करण्याचे काम ही स्वाब संस्था ‘प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान’ राबवून श्रमदानातून करीत असते. व वर्षातून परिसरातील प्रत्येक जंगला लगतचे स्थळ हे तीनदा प्लास्टिक मुक्त करीत असते. याच संदर्भाने ‘स्वाब नेचर केयर ‘संस्थेच्या वतीने घोडाझरी अभयारण्याचा मुख्य गेट ते तलाव परिसरापर्यंत पाच ते सात किलोमीटरचा अंतर पैदल चालून, तसेच तलाव परिसरातील ओवर फ्लो चा संपूर्ण परिसर पिंजून काढीत घोडाझरी परिसरातील प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पत्रावळी , प्लास्टिक ग्लास, प्लास्टिकच्या पिशव्या, शेकडो दारु बॉटल्स, खऱ्याच्या पन्या, असा मोठ्या प्रमाणात परिसरात पसरलेला प्लास्टिकचा कचरा गोळा करून संपूर्ण तलाव परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आले.
यावेळी स्वाब नेचर केअर संस्था चे यश कायरकर, जिवेश सयाम, नितिन भेंडाळे, छत्रपती रामटेके, हितेश मुंगमोडे,अमन करकाळे, अमीर करकाडे,विकास लोनबले, शुभम निकेशर,शरद गभने, गौरव निकूरे, जीवन गुरनुले, सुमित गुरनुले, गिरीधर निकुरे,महेश बोरकर, तर संस्थेच्या महिला स्वच्छता मैत्रीणी कल्पना सुर्यवंशी/ गेडाम, आचल कायरकर/गभने, मंजुषा अर्चना आंबोरकर, अपूर्वा मेश्राम ,मधु बोरकर, प्रतीक्षा चौधरी, जुही आदे, जानवी बोरकर, सत्या ननावरे, तर वन विभागचे हुमा बिटाचे वन रक्षक एस.एस. कुळमेथे, वनरक्षक सी.एस. कुथे, वनरक्षक सिडाम, यांनी राबविण्यात आलेल्या प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियानाला मोलाचं सहकार्य केले.
नागभीड चे वनपरिक्षेत्र अधिकारी आरुप कन्नमवार यांची परवानगी घेऊन ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.