मूल :-
चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. आज मूलच्या डोनी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून, एका मुलाचा पायाचा अंगठा कटला आहे. त्याचप्रमाणे दोन पुरुषही गंभीर जखमी झाले आहेत. हे अपघात थांबवण्यासाठी प्रशासन कधी जागे होणार?
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या रस्त्यावर आतापर्यंत 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. खड्ड्यांमुळे होणाऱ्या या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि असंवेदनशील वर्तन खपवून घेतले जाणार नाही. आम्ही तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी करीत आहोत. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कठोर आंदोलन केले जाईल.
प्रशासनास राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे की, जर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले नाहीत, तर नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल.आणि संबंधित अधिकाऱ्यांस बेशरमाचे फुल देऊन त्याला जबाबदारीची जाणीव करुन देण्यात येईल. प्रवाशाचा जीव धोक्यात टाकणाऱ्या अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, आणि प्रशासनास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. जनतेच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कधीच मागे हटणार नाही. जर
शासनाने त्वरित कार्यवाही केली नाही, तर होणाऱ्या अपघातांची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कठोर आंदोलन करेल आणि त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील.