Mul :- शहरातील शिवाजी नगर वॉर्ड न. 17 मधील, आठवडी बाजार मधील घाण शेजारील नागरी वस्तीत मागील वर्ष भरापासून टाकल्या जात असल्याने नागरीकाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सदर परिसरात खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व रोगराई पसरली आहे.आठवडी बाजारातील विक्रेत्यांनी सांगितले की परिसरात पाण्याची सुविधा नाही, घंटा गाडी रोज येत नाही आणि सफाई कर्मचाऱ्यांनाडून परिसराची साफसफाई केली जात नाही. सदर बाब नगर परिषद मुल ला वारंवार निवेदन देऊन लक्ष्यात आणुन दिली आहे, परंतु नगर परिषद ने सदर विषयाकडे लक्ष दिले नाही.
या कारणास्तव सदर नागरी वस्तीत खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
-
आज डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात भूमिपुत्र ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदर वॉर्ड मधील लोकांनी अश्या दुर्गंधीत जगावं तरी कस? असा प्रश्न नगर परिषद मुल च्या मुख्याधिकारी यांना केला. भूमिपुत्र ब्रिगेडने मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले की आठवणी बाजार परिसरात सुविधा अभावी घाण पसरली आहे. आणि मागणी केली की पाण्याची व्यवस्था करावी, रोज दोनदा घंटा गाडीची फेरी, सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि स्वच्छता अधिकारीकडून परिसराची नियमित पाहणी करावी. मुख्याधिकारी स्वतः डॉ. अभिलाषा गावतुरे आणि भूमिपुत्र ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत आठवडी बाजार परिसराची पाहणी केली. मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मटन व चिकन विक्रेतांना तात्काळ नोटीस दिली आणि पुन्हा घाण पसरल्यास तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी सूचना चिकन व मटन आणि इतर विक्रेत्यांना दिली.
यावेळी प्रणय बेंदले, अतुल मडावी, सचिन आंबेकर, दीपक बोर्डावर, सोनू तावाडे, हर्षा आंबेकर, वनिता मडावी, पोर्णीमा मडावी, रूपा बनसोड , मंदाबाई मडावी, किरण बेंदले, स्विटी बेंदले, निर्मला निकोडे यांची उपस्थिती होती.