मूल शहरातील ताडाळा रोड येथील पथदिवे सुरू करा भूमिपुत्र ब्रिगेड मूलची मागणी

0
160

(कुमुदिनी भोयर )

मूल :- मुल ताडाळा येथील रोड या मार्गावरील मागील अनेक दिवसांपासून मुल ताडाळा रोडवरील मुल नगरपरिषदेने स्ट्रीट लाईटचे पोल लावण्यात आले परंतु त्या मार्गावरील सर्व स्ट्रीट लाईटचे पोल बंद असल्यामुळे प्रभाग क्र. 8 वॉर्ड नं.15 येतील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. मुख्य म्हणजे ताडाळा चीचाळा हळदी मार्गे या गावातील काही नागरिक कामाकरिता मुल येतात व त्यांना परत जाण्याकरिता रात्री 10 वाजतात याच परिसरामध्ये वाघाचा वावर असल्याने येण्या-जाण्याकरिता नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे काही दिवसांपूर्वी ताडाळा येथील वाघांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला आहे परंतु या मार्गावरील सर्व लाईट बंद असल्याने भीतीचे वातावरण पसरलेल्या असल्यामुळे मार्गावरील सर्व स्टेट लाईट चालू करून द्यावे अशी मागणी नितेश मॅकलवार शहराध्यक्ष भूमिपुत्र ब्रिगेड यांच्या नेतृत्वात अक्षय लेनगुरे,संकेत चौधरी,जयकिशन कस्तुरे,गौरव खोब्रागडे,सुजल घुबडे,राजू वाढई, शरद मेश्राम,प्रसाद अलगुनवार,दिशांत कस्तुरे,रोशन लोखंडे,सुशांत कस्तुरे,संजय रायपुरे,सचिन भट्टे, विठ्ठल शेंडे व बहुसंख्य नागरिक मुख्याधिकारी कडे निवेदन देण्यात आले.

Previous articleनगरपरिषद आणि उपजिल्हा रुग्णालयातील समन्वयाअभावी आमदार निधीतून दिलेली रुग्णवाहीका धुळखात 
Next articleजीवनात खिलाडी वृत्ती ठेवल्यास आयुष्य आनंदाचे होते – ठाणेदार सुमित परतेकी : प्रेस क्लब मूल चा Meet the Press उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here