नगरपरिषद आणि उपजिल्हा रुग्णालयातील समन्वयाअभावी आमदार निधीतून दिलेली रुग्णवाहीका धुळखात 

0
70

Mul :- मुल शहरातील अत्यावश्यक आरोग्यसेवांमध्ये महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रुग्णवाहिकेमुळे सर्वसामान्य कुटूंबातील रुग्णांना आर्थिक फटका बसत असून क्षेत्राचे आमदार जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच्या आमदार निधीतून एक रुग्णवाहीका मुलं उपजिल्हा रुग्णालयाला नगरपरिषद मुलं मार्फत उपलब्ध करुन दिली.पण ती रुग्णवाहीका उपजिल्हा रुग्णालयात धूळ खात पडली असून शोभेची वस्तू ठरली आहे.

मुलं येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या रुग्णाची सख्या मोट्या प्रमाणात आहे. ज्या रुग्णावार इथे उपचार करणे शक्य नाही त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविले जाते. त्यांच्यासाठी शासनाची 108 ही रुग्णवाहीका आहे पण ती सुद्धा रेफर रुग्णाची संख्या लक्षात घेता त्याची सेवा सुद्धा अपुरी पडत आहे. अशा परिस्थितीत रुग्णाच्या खिशाला कात्री लागत असून आधीच आर्थिक विवेचणेत जगत असलेल्या सर्वसामान्य लोकांना यांचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.

आमदार निधीतून दिलेल्या रुग्णवाहीकेच्या ड्रायव्हर आणि देखभाल दुरुस्तीचा खर्चाची तरतूद कोण करणार यांची जबाबदारी घेण्यासाठी दोन्ही यंत्रणा हात वर करीत आहेत अशा चालढकल पद्धतीमुळे लाखो रुपयाच्या शासकीय निधीतून खरेदी केलेली रुग्णवाहीका धूळ पडली असून जनतेसाठी कूचकामी ठरत आहे.

म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुलं नगरपरिषदचे मुख्याधिकारी संदीप दोडे यांची भेट घेऊन तात्काळ रुग्णवाहीका जनतेच्या सेवेत उपलब्ध करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष रोहित कामडे, आदित्य गेडाम, रितिक शेंडे, गोलु दहिवले, शुभम निमगडे, यश लेनगुरे, पिंपळे, सुमित बोरकुंटावार इत्यादी उपस्थित होते.

Previous articleबिबट्याने 6 वर्षीय मुलावर केला हल्ला    18 तासाने मिळाले त्या मुलाच्या शरीराचे चार तुकडे
Next articleमूल शहरातील ताडाळा रोड येथील पथदिवे सुरू करा भूमिपुत्र ब्रिगेड मूलची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here