वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यु ; मूल तालुक्यातील घटना

0
114

 

 

 

Mul :- मूल तालुक्यातील चिंचोली येथील वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची घटना आज दिनांक 19 सप्टें. रोजी 4.30 ला घडली. देवाची वाऊलु राऊत वय वर्ष 62 राहणार चिचोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.

मूल येऊन जवळच असलेल्या ताडोबा बफर मूल वनपरिक्षेत्रातील चिचोली शिवार, बिट काटवन, कक्ष क्रमांक 756 परिसरात देवाजी गुऱ्हे चरायला नेला होता. दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गावात माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

मूल तालुक्यात वाघाचे हल्ले मानवावर वाढल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेची बाब झाली आहे. वन्य प्राण्यांचे असे हल्ले आम्ही किती सहन करायचे असे गावकऱ्यात बोलल्या जात आहे. माणूस महत्त्वाचा की वाघ अशी ही चर्चा होत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी भूमिपुत्र ब्रिगेडचे राकेश मोहुर्ले आणि गावकऱ्यांनी केली आहे.

Previous articleजंगलात गुरे चारायला गेलेल्या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू  
Next articleबिबट्याने 6 वर्षीय मुलावर केला हल्ला    18 तासाने मिळाले त्या मुलाच्या शरीराचे चार तुकडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here