मूल
दिनांक 19 सप्टेंबर 2024 ला चिंचोली मुल येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. देवाजी बाबुराव राऊत वय वर्ष 62 या इसमाची बकरी चराई करताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू मुखी पडल्याची दुःखद घटना घडली आहे. या महिन्यातील टाडाळा जाणारा मरेगाव येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याच्या बातम्या ताज्या असतानाच ही घटना घडली गत कित्येक वर्षांमध्ये विशेष करून मागच्या सहा महिन्यांमध्ये वाघ व बिबट च्या हल्ल्यामध्ये गुराखी व शेतकरी यांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. घरचा कमवता व्यक्ती गमवल्या मुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
काँग्रेस नेत्या तथा भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी वाघाच्या बंदोबस्ता करिता अनेक वेळा निवेदन देऊन व मागण्या करून वनविभागाचे लक्ष या गंभीर बाबी कडे वेधले आहे. परंतू मानवी जिवा पेक्षा डुक्कर, वाघ महत्वाचा असलेल्या वनविभागाने या मागण्या कडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परिसरातील जनता वाघाचा बळी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
विशेष करून गाय, बकरी, म्हैस यांच्या चराई करिता चरण कुरणे उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाला अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे परंतु सद्यास्थीती पर्यंत वनविभागाने चराई कूरणा करिता ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात सामान्य नागरिकाचे जीव जात असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे वन्यप्राण्याच्या बंदोबस्ता मध्ये वनविभाग व प्रशासन सपेशल अपयशी ठरले आहे.
जिल्ह्यामध्ये वनविभागाचे प्रमुख पद असलेले मुख्य वनसंरक्षण चंद्रपुर हे पद गेल्या कितेक महिन्या पासून रिक्त असून ताडोबाचे मुख्य वनसंरक्षक यांच्या कडे वनप्रशासनाने या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. त्यामुळे त्याच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. त्यात ताडोबा महोत्सव, वनमहोत्सव, कास्ट रवानगी महोत्सव आदी कार्यक्रमा मध्ये ते व्यस्त झाले आहे. तर हे सर्व कार्यक्रम करून घेण्यात वनविभागाचे प्रधान सचिव पासून ते वनविभागाचे सर्व छोटे मोठे अधिकारी कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक, शेतकरी व गुराखी यांच्या मुख्य प्रश्नाला बगल दिल्या जात आहे. त्यामुळे सामान्य माणूस वाघाचा बळी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यात वनविभाग शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजने अंतर्गत सौर झटका मशीन वाटप सारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर जाहिरात व प्रसिद्धी करून राजकीय पक्षाच्या प्रचार सारखे करून वाघाच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या इसमाच्या परिवाराच्या दुखाःवर मिठ चोळण्याचा प्रकार करत असल्याची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री हे वनमंत्री असून देखील याविषयी ब्र काढायला तयार नाही.
सामान्य शेतकरी व गुराखी यांच्या जीविताची किंमत काही हजार आणि लाख ठरवली आहे आणि वनविभाग एक ठराविक रक्कम देऊन आपल्या मूळ जबाबदारी पार पाडण्यात अपयशी झाले आहेत.
सरकार आणि वनविभागाच्या या असंवेदनशील वागणुकीचा भूमिपुत्र ब्रिगेडने जाहीर निषेध केला असून वन महोत्सव यांच्या प्रचार, प्रसिध्दी व जाहिरातीमध्ये अखंड बुडालेल्या वनविभाग व सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पाळीव जनावराच्या चराईच्या प्रश्नावर निष्काळजी करणाऱ्या या घटलेला जबाबदार असलेल्या वनविभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करण्याची व मुख्यवनसंरक्षक चंद्रपुर हे पद तात्काळ भरण्याची मागणी केली आहे.
चराई क्षेत्र निर्माण करणे, दोषीवनाधीकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे, वाघाचा बंदोबस्त करणे याकरिता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहीती यावेळी काँग्रेस नेत्या आणि भूमिपुत्र ब्रिग्रेडच्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी सांगितले
आणि म्हणून वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळांचा आणि शेतकऱ्यांचा बळी वाघाने घेतल्या नसून वनविभागाने घेतलेला आहे आणि म्हणून वनविभागावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार आज पोलीस स्टेशन मुल येथे काँग्रेस नेत्या आणि भूमिपुत्र ब्रिगेड मार्गदर्शिका डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी केली आहे
यावेळी मुल तालुक्याचे काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष
- अध्यक्ष जेष्ठ नागरिक नामदेवरावजी गावतुरे समता परिषदेच्या कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, छाया सोनुले,सीमा लोणबुले, विक्रम गुरनुले, नितेश म्याकलवार, राकेश मोहूर्ले,संतोष चिताळे कालिदास गायकवाड,दिवाकर चौधरी,दामोदर किन्नाके,सुखदेव मगरे,वामन सोनवणे, संतोष गायकवाड,समीर उमरकर, विश्वनाथ चचाटे,कोंडू घरत, भोजराज कोवे, रामदास सीडाम,संजय नागपुरे, दिलीप चौधरी, भाऊजी नेवारे, बंडू बावनवाडे, दीपक राऊत,सचिन मुंडवार जोगेश्वर ठाकरे,मारुती मगरे, करण ठाकरे यांच्या शेकडो चिंचोलीवासी उपस्थित होते.