मूल :- मूल शहरात प्रभाग क्रमांक 3 येथे दलितोत्तर वस्ती सुधार निधी अंतर्गत ओपन प्लेस अभ्यासिका केंद्र बनविण्यात आले.परंतु अभ्यासिकेचा बांधकाम 8-8-2023
ला पूर्ण झालेला असून सुद्धा सदर अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक होतकरू व गरीब विद्यार्थी अभ्यासिकेपासून वंचित आहेत. त्यामुळे आपणास विनंती आहे की सदरहून अभ्यासिका सुरू करून होतकरू गरीब विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता सुरू करून द्यावे अशी मागणी काँग्रेस नेत्या तथा भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका अभिलाषा ताई गावतुरे यांच्या मार्गदर्शनात नितेश मॅकलवार भूमिपुत्र ब्रिगेड शहराध्यक्ष नेतृत्वात मुल नगर परिषद येथे निवेदन देण्यात आले यावेळी सचिव सचिन आंबेकर, सहसचिव मनोज मोहुर्ले, राहुल बारसागडे,अतुल मडावी व असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी व भूमिपुत्र ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.