मूल तालुक्यातील चितेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटे चार वाजताचे दरम्यान घडली. राहुल मंदावर वय 40 वर्ष असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.i
मृतक राहुल मंदावार हा डब्लू.सी. एल. दुर्गापूर येथे कार्यरत होता. काही दिवसापासून तो चितेगाव येथील आजोबाकडे राहत होता. आजी आजोबा बाहेरगावी गेले होते. राहुल हा घरी एकटाच असल्याने घरी कोणी नसल्याची संधी बघून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमकं कारण कळू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत.
घटनेची माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. लगेच ही माहिती मूल पोलीसला देताच घटनास्थळी पोलीस हे दाखल झाले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.