(वन्य जीवांच्या शिकारी करता विद्युत प्रवाह लावला होता का ?परिसरातील लोकांमध्ये वेगवेगळ्या संशयांना उत.)
यश कायरकर:
ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या मेंडकी जवळील गणेशपूर त. ब्रहपुरी येथील चार जणांचा विद्युत प्रवाहाने म्रुत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
जंगलालगत व नाल्यालगत असलेल्या प्रकाश राऊत व नानाजी राऊत यांच्या शेताला लावून असलेल्या विद्युत तारेच्या कुंपणाला स्पर्श करून चारही शेतकरी मृत झाल्याची घटना आज लोकांच्या निदर्शनास आली.
यामध्ये मृतक पुंडलिक राऊत, प्रकाश राऊत, नानाजी राऊत आणि युवराज डाेंगरे हे चारही जण विद्युत तारेला हात लावून मृत झाल्याचे यावेळी कळले. मृत व्यक्तीचे शेत गावापासून साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर असून हि घटना सकाळीच 7-8 वाजे घडली असावी परंतु तिकडे कुणीही न गेल्यामुळे ती उशिरा या घटनेची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की,
ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपुर गावात शेतात गेलेल्या शेतकर्यांना वीज प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे, नानाजी राऊत यांचा समावेश आहे. या घटनेत एक शेतकरी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
शेतकऱ्यांनी सकाळी शेतीच्या कामासाठी शेतात प्रवेश केला असता ही दुर्घटना घडली. प्रकाश राऊत व नानाजी राऊत यांच्या शेतामध्ये कुंपणाला जोडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने चौघांचाही दुर्दैवी अंत झाला. मात्र चौकशी केली असता विद्युत विभागाची कुठलीही तार या परिसरात तुटलेली नसून किंवा कुठल्याही विद्युत तारेचा या शेत कुंपणाच्या तारेशी संपर्क झाला नसल्याचे निदर्शनास आले. मात्र घटनास्थळी मृत्यकांचे मृतदेह हे तारेला स्पर्श करून असल्यामुळे या कुंपणाच्या तारेला नेमका विद्युत करंट आला कुठून ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून. तारेला कुठून ना कुठून विद्युत प्रवाह जोडण्यात आला होताच. आणि हा कुंपणाच्या तारेला जोडण्यात आलेला विद्युत प्रवाह हा नेमका वन्यजीवांच्या शिकारीसाठीच जोडण्यात आलेला असावा की काय? ही शक्यता वर्तवली जात आहे. व परिसरातील काही लोकांनी असा संशय व्यक्त केलेला आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस विभाग व विध्यूत विभाग चे अधिकारी घटनास्थळी पोहचले व मोक्का पंचनामा केला समोरील चौकशी सुरू आहे.
*जंगलालगतच्या गावांमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना वन विभागामार्फत झटका मशीन व सोलर कुंपणाचा वाटप केल्या जातो ही मोठ्या प्रमाणात शासनामार्फत सबसिडी देऊन योजना राबविण्यात येते. मात्र काही शेतकरी या योजनेचा लाभ घेतात तर काही मुद्दाम शिकारीच्या नादामध्ये विद्युत तारेचा खुला स्पर्श आपल्या शेतामध्ये सोडतात. व वन्यप्राणी, विशेषतः रानडुक्करांच्या, हरिन किंवा वाघाच्याही शिकारी करीता शेताच्या कुंपणात वीज पुरवण्याचा प्रकार करतात. हा ही असाच प्रकार घडला आहे का? असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण हे संपूर्ण शेत जंगला व जंगलालगतच्या नाल्यालगत असल्यामुळे या संशयाला बळ मिळत आहे. या संपूर्ण बाबीची सविस्तर चौकशी होणे व जो कोणी याकरिता दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण दरवर्षी कुंपणाच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह लावून कित्येक वन्यजीव मारले जातात. मात्र जर बारकाईने व गंभीरतेने पाहिले असता या विद्युत तारेच्या स्पर्शाने वन्यजीवांपेक्षा जास्त लोकांची जिव गेली असल्याची घटनाही मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. त्यामुळे जर कोणी शिकारी करिता विद्युत प्रवाह लावला असेल तर त्याच्यावरही कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.* असे वन्यजीव प्रेमींचे व परिसरातील काही सुशिक्षित लोकांचीही मागणी आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी खोसरे सर ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बनवाडे यांच्या द्वारे हा तपास सुरू आहे.
या खडबड जनक व दुखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.