मुल येथे संतोष सिहं रावत मित्रपरिवारच्या वतीने भव्य घरगुती गणपती स्पर्धा

0
320

संतोषसिंह रावत मित्रपरिवार मूल च्या वतीने मूल शहरातील जनतेसाठी विनाशुल्क भव्य घरगुती गणपती स्पर्धा आयोजित केली आहे. पहिल्या दिवसापासून दहा दिवस घरी श्री गणेशाची स्थापना करणारे भाविक सदर स्पर्धेत विनाशुल्क सहभागी होऊ शकतात. यामध्ये गट-अ एक ते तीन दिवस पर्यंत श्री गणेशाची स्थापना, गट ब एक ते पाच दिवस पर्यंत श्री गणेशाची स्थापना, गट क एक ते दहा दिवस पर्यंत श्री गणेशाची स्थापना अशी असेल.

घरी स्थापन केलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीचे वेगवेगळ्या बाजूने काढलेले बारा बाय अठरा आकाराचे एकूण तीन स्पष्ट दिसतील असे फोटो लिफाफ्यात बंद करून गांधी चौक मुल येथील काँग्रेस भवन आणि चंद्रपूर मार्गावर असलेल्या श्री दुर्गा मंदिरात स्पर्धेच्या पेट्या ठेवण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल अनंत चतुर्थीच्या दिवशी जाहीर करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. गट अ बक्षीस 2501 रूपये, द्वितीय बक्षीस 1501 रुपये आणि गट ब प्रथम बक्षीस 3501 रुपये, द्वितीय बक्षीस 2501 रुपये तर गट क करिता प्रथम बक्षीस 5501 रुपये द्वितीय बक्षीस 3501 रूपये असा बक्षीसांचा वर्षाव आहे.

अधिक माहिती करिता संजय पडोळे, गुरु गुरूनुले, अशोक येरमे, विवेक मुत्यलवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. पहिल्या अ गटातील स्पर्धकांनी तीन दिवसाच्या आत दुसऱ्या ब गटातील स्पर्धकांनी पाच दिवसाच्या आत आणि तिसऱ्या क गटातील स्पर्धक आणि नऊ दिवसाच्या आत फोटो काढून पेटीत टाकावे त्यानंतर फोटो स्वीकारल्या जाणार नाही असे सांगण्यात आले आहे.

श्री गणेशाच्या मूर्तीचा आकार, स्वरूप आणि रंगरंगोटी, श्रीगणेशाची स्थापना केलेल्या मंचाची सजावट, मंच सजावटी मागील संदेश आणि विषय यावर स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी फोटोच्या लिफाफ्यावर पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, गटाचे नाव लिहावे. असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

Previous articleप्रशांत कवासे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Next articleमुल येथे नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य गणेशोत्सव स्पर्धा 2024 सार्वजनिक व घरगुती गटात होणार स्पर्धा, भारतीय जनता पक्षाचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here