चंद्रपूर जिल्हा जलतरण असोसिएशन चंद्रपूर द्वारे यावर्षी पहिली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा 19 वर्ष वयाखालील घेण्यात आली, सदर स्पर्धेत चंद्रपूर शहरातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते, संपूर्ण जिल्ह्यातील स्पर्धकांच्या स्पर्धेत मुल सारख्या ग्रामीण भागातील स्पर्धक प्रथम येणे तेही कोणत्याही प्रकारची कोचिंग नसताना ही नक्किच कौतुकास्पद गोष्ट आहे, आदित्य हा मुलच्या जलतरण संघटनेचा सदस्य असून त्यांचे वडील हे मुल येथील नगर परिषद च्या जलतरण तलावाचे ऍड बल्लू नागोसे यांच्या सोबत संचालन करतात, आदित्य याला मुल येथील उमा नदीमध्ये पोहण्याचा मागील अनेक वर्षांचा अनुभव आहे, जलतरण संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर रणदिवे तसेच जलतरण संघटनेच्या सर्व सदस्यांनी आदित्य चे अभिनंदन केले आहे.