मूल
दोन दिवसांपूर्वी शेजारील घराची भिंत कोसळून मुल तालुक्यातील फीस्कुटी गावातील घराची भिंत कोसळून अशोक मोहूर्ले व लता मोहूर्ले हे दांपत्य ठार झाले होते, सदर घटनेने गावात शोककळा पसरली होती, या घटनेची माहिती होताच जिल्ह्याचे पालकमंत्री व क्षेत्राचे आमदार नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांत्वन करायला पाठवून आर्थिक मदत केली, प्रसंगी मुल नप चे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे , फिस्कुटी ग्रामपंचायत चे सरपंच नितीन गुरनुले, उपसरपंच राकेश गिरडकर, मिलिंद खोब्रागडे, राकेश ठाकरे,प्रमोद कोकुलवार, ऍड आझाद नागोसे, प्रवीण मोहूर्ले(चिंमढा), सतीश कावळे,राजेंद्र वाढई, आकाश गुरनुले, खाजू शेंडे, संतोष मोहूर्ले, तुळशीराम मोहूर्ले, बबलू निकोडे, साईनाथ लेनगुरे व गावातील नागरिक, मृत दाम्पत्याच्या चारही मुली, नातेवाईक उपस्थित होते.