मूल :- नवयुवक तान्हा पोळा उत्सव समिती मूल तर्फे चंद्रपुर रोड, मूल येथे भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला विशेष आकर्षण माँ कामाश्री म्युझिकल ग्रुप कुही, राम गणेशजी क्षीरसागर, गायक सुरज धनजोडे कुही हे असणार आहे. बालगोपाळांसाठी उत्कृष्ट मोठ्या नंदी तीन बक्षिसे रोख स्वरूपात( 5000-3000-2000) , उत्कृष्ट लहान नंदी तीन बक्षिसे रोख स्वरूपात (5000-3000-2000), उत्कृष्ट वेशभूषा तीन बक्षीशे रोख स्वरूपात ( 5000-3000-2000 ) ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा. हंसराजभैय्या अहिर यांच्याकडून ही बक्षिसे असणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक भेट वस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला तसेच स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मित्रपरिवार तर्फे करण्यात आले आहे.