यश कायरकर :-
मूल वन बप्पर क्षेत्रातील येणाऱ्या राखीव वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक ३५३ मध्ये डोनी रोड, राखीव जंगलात मृतक गुलाब हरी वेळमे वय वर्षे ५२ राहनार जानाळा, तालुका मूल गुरे चराईसाठी मुल बफर क्षेत्रात डोनी रोड राखीव जंगलात गेला असता दुपारी १:३० च्या दरम्यान वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मोक्का पंचनामा केला व शव विच्छेदन करीता पाठविण्यात आले.
व परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे लोकांनी गुरे चरायला व इतर कामाकरिता जंगलात आत प्रवेश करू नये. व सावधानता बाळगावी अशा सूचना दिल्या.