तळोधी (बा.):
तळोधी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले अजित सिंग देवरे यांचे नागपूर ग्रामीण येथे बदली झाल्यामुळे त्यांनी नव्याने रुजू तळोधीचे कार्यभार घेणाऱ्या संगीता हेलांडे मॅडम यांना त्यांनी आज कार्यभार सोपवल्यानंतर स्वाब संस्थेच्या वतीने तळोधीवरून बदलून जाणारे अजित सिंग देवरे यांचे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा निरोप घेण्यात आला. तर नव्याने रुजू संगीता हेलांडे मैडम तळोधी पोलीस स्टेशन ठाणेदार यांचा स्वागत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.
17 जाने.2024 रोजी तळोदीचे ठाणेदार मंगेश भोयर यांनी त्यांच्या लोकसभा निवडणूक संदर्भात झालेल्या वर्धा जिल्ह्यातील त्यांच्या बदलीनंतर मोझरी येथून तळोधीला बदलून आलेले नवीन ठाणेदार अजित सिंग देवरे यांना कार्यभार सोपवला होता. आज 29 आगस्ट 2024 रोजी अजित सिंग देवरे यांची सुद्धा विधानसभा निवडणूक संदर्भाने आठ महिन्याच्या अल्पशा कालावधीतच नागपूर ग्रामीण विभागात बदली झाली. दोन्ही युवा ठाणेदारांनी परिसरातील युवकांशी व जनतेशी मैत्री संबंध जोपाशीत त्यांच्या कालावधीमध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळीत व्यवस्थित असा कार्यभार सांभाळला होता. त्यामुळे त्यांच्यासोबत नागरिकांचे अत्यंत जवळचे असे भावनिक संबंध जोडलेले होते. आज देवरे सरांच्या बदलीनंतर त्यांना निरोप देण्याकरता स्वाब संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप दिला. तर तळोधी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेल्या नवीन ठाणेदार संगीता हेलांडे मॅडम यांना त्यांच्या तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत समोरील कार्याकरीता शुभेच्छा देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचेही स्वागत केले. यावेळी तळोधी पोलीस स्टेशन परिसरातील संपूर्ण पोलीस पाटील यांनी उपस्थित राहून अजित सिंग देवरे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सदिच्छा भेट देत त्यांना निरोप दिला तर नवीन हेलांडे मॅडम यांचे स्वागत केले.
या निरोप समारंभ व स्वागत समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये अजित सिंग देवरे यांनी बोलताना त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना दिलेल्या सहकार्य व आदरांबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले तर अशीच साथ नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार यांना सुद्धा त्यांच्या समोरील कार्यकाळाकरिता सर्वांनी द्यावी व कायदा सुव्यवस्था जपावी असे यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, वन्यजीव बचाव पथकाचे संस्थेचे प्रमुख जिवेश सयाम सर्पमित्र, संस्थेचे पदाधिकारी भोलेनाथ सुरपाम, शुभम निकेसर , अमन कडकाडे, अपुर्वा मेश्राम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.