तळोधी (बा.) नागभिड पोलिस स्टेशन अंतर्गत जनकापूर येथिल एका चिमुकल्या मुलीला चाकलेट चे आमिष दाखवून विनयभंग केल्याची घटना काल उजेडात आली असुन. घटनेची तक्रार पोलिस स्टेशनला देताच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार जनकापूर येथिल दुसऱ्या वर्गात शिकणारी आठ वर्षीय चिमुकली सुट्टीच्या दिवसी खेळतं असतांना गावातील एका नराधम इसमांनी चाकलेटचे आमिष दाखवून विनयभंग केला. घटनेच्या दोन तिन दिवसानंतर मुलीने सदर घटनेची माहिती पालकांना दिली असतां घटनेची तक्रार नागभिड पोलिस स्टेशनला दिली असतां आरोपी महादेव गोरडवार (वय ५२ वर्ष) याला अटक करण्यात आली असुन भादवी कलम ६५/२, पोस्को -४ अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.नि. अमोल काचोरे यांचें मार्गदर्शनात नागभिड पोलीस करीत आहे.