मूल येथिल काजल देविदास भडके ( 24 ) पोलीस कॉन्स्टेबल यवतमाळ जिल्हा पोलीस ड्रायव्हिंग या पदावर पोलीस विभागात नियुक्ती झाली. काजल ही एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे. आई-वडिलांनी मोलमजुरी करून काजलचे शिक्षण पूर्ण केले. काजल ही मूल येथिल कॉलेज ग्राउंड वर रोज मेहनत करायची. कॉलेज ग्राउंड वर रोज फिरायला जाणाऱ्या तिचे मित्रमंडळी सोबतच मूल शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.