मूल
सणासुदीच्या काळातसुद्धा पोलिसांसमोर मोठी आव्हाने असतात. कर्तव्यापासून सार्वजनिक सुरक्षेची जबाबदारी आणि उत्सव शांततेत पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते सणासुदीच्या काळात सुद्धा स्वतःच्या परिवाराला वेळ देऊ शकत नाही याची खंत बाळगत त्यांच्या कार्याची दखल घेत कृतज्ञता व्यक्त करत शिवसेना महिला आघाडी कडून पोलीस स्टेशन मुल येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मा. ठाणेदार साहेब सुमित परतेकी व इतर पोलीस बंधूंना राखी बांधून शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. भारतीताई राखडे,शहर प्रमूख सौ.अर्चनाताई सहारे, उपशहर प्रमुख श्रीमती, उर्मिलाताई कोहळे, तालुका संघटिका सौ. निर्मलाताई कामडी सौ. वैशालीताई गुरुकार, सौ.भाग्यश्रीताई किरमे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.