तळोधी (बा.) येथिल श्री गुरुदेव कला मंच च्या वतीने नेहमीच वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात त्याच प्रमाने दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोज शनिवारला सामुहीक रक्षाबंधन सोहळा महात्मा फुले चौक येथे भव्यरित्या आयोजीत केला होता.परंतु वातावरनाचा बदल लक्षात घेता हा कार्यक्रम श्री विठ्ठल रुख्मीन मंदरी तळोधी (बा.) येथे छोटेखानी घेन्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी खोजरामजी मरस्कोल्हे माजी जिल्हापरीषद सदस्य , कार्यक्रमाला विशेष अतीथी म्हनुन मा.मानकर साहेब सह. पोलीस उपनिरीक्षक पो.स्टे तळो़धी , मा.लांबट साहेब सह. पोलीस उपनिरीक्षक तळोधी , सौ पुस्पलताताई बोरकर सामाजिक कार्यकर्त्या तळोधी (बा.) तर प्रमुख पाहुने म्हनुन मा.जिवेश सयाम सर्पमित्र ग्रा.प सदस्य ,प्रा.अतुल कामडी अध्यक्ष जय संताजी तेली समाज तळोधी (बा.),मा.कोमलजी ढबाले अध्यक्ष अखिल भारतीय कुनबी समाज तळोधी (बा.),मा.दिलीप बारसागडे अध्यक्ष संत श्री नगाजी महाराज नाभिक समाज तळोधी (बा.) उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले चौकातील क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व क्रांतीसुर्य माहात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मारकाला पाहुन्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करुन करन्यात आली .त्या नंतर मंदीरातील श्री विठ्ठल रुख्मीन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करुन सामुहीक रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला सुरवात करन्यात आली.सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक मानकर साहेबांनी देशात चालु असलेल्या महीलांवरील अत्याचाराला आळा कसा घालायचा हे पटवुन सांगीतले तर प्रा.अतुल कामडी यांनी श्री गुरुदेव कला मंच ला प्रेरीत करत मंडळाद्वारे होनाऱ्या सर्व सामाजीक ऊपक्रमांना खंबीरपने साथ देन्याचे वचन दिले.तर अध्यक्षीय भाषनात श्री खोजरामजी म्हरस्कोल्हे यांनी विद्यार्थि विद्यार्थीनींना संबोधुन म्हनाले की मोबाईल मध्ये योग्य गोष्टी घेन्यासारख्या खुप आहेत परंतु त्या चांगल्या गोष्टी घेता आल्या पाहीचे जर विद्यार्थ्याने विचार केला तर मोबाईलमुळे विद्यार्थी अधिकारी सुद्धा बनु शकतात फक्त मोबाईलचा उपयोग चांगला केला पाहीजे.त्यानंतर कोलकत्ता,बदलापुर,वाढोना, नागभिड ईत्यादी ठीकानी झालेल्या महीलांवरील अत्याचार प्रकरनांचा मेनबत्ती प्रज्वलीत करुन निषेध करन्यात आला.व त्यानंतर सामुहीक रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडन्यात आला सदर कार्यक्रमास प्रामुख्याने डॉ. गौरव देशमुख साहेब श्री श्रीरामजी कावळे,श्री बबनजी गुरनुले,श्री लक्ष्मनजी लोनबले,श्री विनोदजी मुरकुटे,श्री यशवंतजी कायरकर,पोलीस कर्मचारी पो.स्टे तळोधी (बा.) श्री गुरुदेव सेवा मंडळ तळोधी चे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री भुपेश भाकरे सर प्रास्ताविक श्रीमती वैशालीताई लांजेवार व आभार प्रदर्शन प्रा.सचिन वाढई सर यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीतेकरीता कार्यक्रम समीतीचे अध्यक्ष श्री सौरभ गिरडकर व श्री गुरुदेव कला मंच चे मुख्य प्रवर्तक श्री दुर्गदास बावनथडे यांचे नेतृत्वात सतीष गिरडकर,दिवाकर मोहुर्ले,सुमीत गुरनुले,प्रमोद बावनथडे,भुषन गुरनुले,लोकेश कावळे,अमोल मोहुर्ले,अजय निकोडे , नितीन भेंडाळे,केशव वरखडे,आणि वैभव बारसागडे यांनी परीश्रम केले.