राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार राजुरा बल्लारपूर ब्रम्हपुरी विधानसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार आहे त्यासाठी विधानसभा निवडणूक निरीक्षक तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ महासचिव संजय कन्नावार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनासाठीची आढावा बैठक पार पडलेली आहे.लवकरच या विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचा मेळावा घेण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. आणि त्यानंतर लवकरच माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
1) सर्व समाजाची जात निहाय जनगणना झाली पाहिजे .
2) आरक्षणामुळे बिघडलेला सामाजिक असमतोल दूर करण्यासाठी, कायमचा तोडगा काढण्यासाठी आरक्षणाचे 50% चे सिलिंग हटवले पाहिजे.
3) वाढलेली बेरोजगारी कमी करण्यासाठी युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला पाहिजे.
4) शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. तसेच शेतकऱ्याला शेतीपूरक उद्योग करण्यासाठी धोरण तयार केले पाहिजे यासाठी अर्थ पुरवठा करणाऱ्या बँकांना बँक गॅरंटी सरकारने दिली पाहिजे.
5) महिलांवर /मुलींवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात कठोर कायदे तयार केले पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी कठोरपणे झाली पाहिजे.
6) ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
7) सर्वोच्च न्यायालयाने एस.टी.च्या आरक्षण संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्र सरकारला दिलेले आहेत . त्यानुसार धनगर समाजाच्या एस. टी. च्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे.
8) सर्वांना समान आणि मोफत शिक्षण मिळाले पाहिजे.
9) सर्वांना आरोग्याच्या सुविधा मोफत मिळाल्या पाहिजेत.
10) घरकुलांसाठी शहरी आणि ग्रामीण भाग असा फरक न करता पाच लाख रुपये अनुदान दिले पाहिजे.
या मुद्द्यांना घेऊन महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीला राष्ट्रीय समाज पक्ष सामोरे जाणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचा 21 वा वर्धापन दिन सोहळा अकोला येथील मराठा सभागृहात 29 ऑगस्ट 2024 रोजी साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमातूनच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर साहेब महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.