तळोधी बा.:
लोक विद्यालय तळोधी बाळापुर येथील आज सर्प विज्ञान अंतर्गत ‘साप, सर्पदंश, अंधश्रद्धा व विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
‘स्वाब संस्थेचे’ सर्पमित्र जीवेश सयाम व यश कायरकर यांच्या द्वारे हे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सापाच्या एकूण जाती, त्याचे विषारी निमविषारी व बिनविषारी असे तीन प्रकार आपल्या परिसरामध्ये आढळणाऱ्या विषारी जाती व बिनविषारी जाती, त्यांची ओळख विषांचे प्रकार, सर्पदंश होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, सर्पदंशाच्या नंतर काय काळजी घ्यावी, या संदर्भाने सविस्तर मार्गदर्शन जिवेश सयाम यांनी सुरुवातीला केले.
तर त्यानंतर सापाबद्दलच्या विविध अंधश्रद्धा, साप चावल्यानंतर विदेशात व आपल्या देशात मरणाऱ्यांच्या संख्येची तफावत, यामागचे मुख्य कारण, आपल्या देशातील अंधश्रद्धा व नागमोत्याकडे जाऊन सापाचे जहर उतरत नाही तर शासकीय रुग्णालयातील एंटीवेनम्स मुळे माणसाचे जीव वाचू शकते, अंधश्रद्धेमुळे जीव गमावू नका असे सांगत त्याकरता लागू होणार्या जादूटोणाविरोधक कायद्या बद्दल सविस्तर माहिती यश कायरकर यांनी दिली. या कार्यक्रमाची प्रस्तावना, संचालन शिक्षक श्री संतोष नन्नावार यांनी केले. तर कार्यक्रमाचे शेवटच्या टप्प्यात शाळेतील इको क्लब ची अध्यक्ष कु. आकांक्षा गहाणे या विद्यार्थ्यांनी ने सर्वांचे आभार मानले.