तळोधी (बा.)
नागभिड वनपरिक्षेत्रातील जनकापूर येथे रात्रो बिबट्याने हल्ला करून गोठ्यात तिन शेळ्या ठार केल्याची घटना सकाळी उजेडात आली.
जनकापूर हे गाव जगंलव्याप्त परिसरात येत असुन येथे नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. आज (ता.२३) ला रात्रो एक वाजताचे दरम्यान गावात दोन बिबट्याने प्रवेश करून विशाल आनंदराव मेश्राम यांचे मालकिच्या तिन शेळ्यावर गोठ्यात हमला केले. दोन शेळ्या जागिच ठार करून एक शेळी जंगलात घेवून पसार झाला. गावांचे मध्यभागी असलेल्या गोठ्यात बिबट्याने हल्ला करून शेळ्या ठार केल्याने नागरिकांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती वनरक्षक गुरूदेव नवघडे यांना दिली असता. मोका पंचनामा करून जंगल परिसरात घेवून पसार झालेल्या शेळीचा शोध घेत आहेत. त्वरीत वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा मानवी जीवाला धोका असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.