मनोरुग्ण महिलेवर अतिप्रसंग करुन व्हिडीओ वायरल करणारे आरोपीना तीन तासात अटक

0
1137

 

 

चंद्रपूर :- आज दिनांक २३ ऑगस्ट, २०२४ रोजी १०:०० वाजता सुमारास पोलीस स्टेशन नागभीड हद्दीत सोशल मिडीया व्हॉटसअपवर आक्षेपार्ह व्हिडीओ वायरल झाल्याचे माहिती पडताच नागभीड पोलीसांनी त्याची तात्काळ दखल घेवुन व्हिडीओ मधील पिडीत महिलेची शोध घेवुन तिची ओळख पटविण्यात आली. लागलीच सदर व्हिीडीओ मधील आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पोलीस पथके तयार करुन आरोपीचा शोध घेतला असता सदर गुन्हयात सामील सर्व आरोपीना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे सांगुन सदर व्हिडीओचे घटनास्थळ नागभीड बस स्थानकातील मुत्रीघर मधील असून दिनांक १२/०८/२०२४ च्या मध्यरात्री दरम्यान पिडीत/मनोरुग्ण महिलेस एकटी असल्याचे पाहुन तिला मुत्रीघरात नेवुन तिचेसोबत एका आरोपीने बळजबरीने अतिप्रसंग केला त्यावेळी त्याच्यातील दुसऱ्या आरोपीने मोबाईलवर त्याचे व्हिडीओ काढले असुन इतर आरोपींनी गुन्हा करण्यास सहकार्य केले.

सदर आक्षेपार्ह व्हिडीओ त्यातील एका आरोपीने त्याचे एका मित्राला व्हॉट्सॲप वर पाठविले असता त्याने सदर व्हिडीओ वेगवेगळे लोकांना व्हॉटसअॅपद्वारे पाठवुन सदर व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे.

सदर आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन नागभीड येथे अपराध क्रमांक २६२/२०२४ कलम ६४ (२) (क), ७० (१), ८७, १२६ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ६७, ६७ (अ) माहिती व तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.

सदर गुन्हयाचे घटनास्थळी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनकर ठोसरे यांनी तात्काळ भेट देवुन प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन मनोरुग्ण महिलेस तातडीचे औषधोपचारासाठी पाठविण्यात आले असुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा उघडकीस आणुन पिडीता व आरोपीची ओळख पटविण्यासाठी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि दिलीप पोटभरे, पोउपनि अनुराधा फुकट पोस्टे. नागभीड, पोलीस निरीक्षक विजय राठोड, पोस्टे. सिंदेवाही, सपोनि अजीतसिंग देवरे, पोस्टे. तळोधी, सपोनि प्राची राजुरकर, सपोनि राजकिरण मडावी पोस्टे ब्रम्हपुरी तसेच गुन्हे शोध पथकाचे पोउपनि विनोद भुरले, पोउपनि रोशन इरपाचे व स्टॉफ तसेच सायबर व फॉरेन्सिक एक्स्पर्टची टिम यांनी सदर गुन्हा काही तासाचे आंत उघडकीस आणुन मोलाची कामगिरी बजावली आहे.

सूचना मिळताच यंत्रणा वेगाने फिरवत पोलिसांनी आरोपी नाव मोहिनी उमर शेख वय 19 रा. नागभीड, हरीनारायण सुनील मांढरे वय 30 रा. नागभीड, मयूर मधुकर वंजारी वय 18 रा. पवनी, कार्तिक प्रमोद बनकर वय 24 रा. नागभीड, कुणाल राजू पाठक वय 19 रा. नागभीड या पाच ही आरोपीना ताब्यात घेतले.

चंद्रपूर पोलीसांद्वारे आवाहन करण्यात येते की, सदर घटने संदर्भात कोणताही व्हिडीओ समाज माध्यमावर पाठवु नये किंवा कोणतीही अफवा पसरवू नये जेणे करुन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे कृत्य केल्यास संबंधीतांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Previous articleदोन युवक अपघातात गंभीर जखमी
Next articleवाढदिवसानिमित्त विधवा महिलेस मदतीचा हात   राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आकाश येसनकर यांचा उपक्रम  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here