पोंभुरणा वासीयांच्या आंदोलनापुढे अखेर प्रशासन नमले जुना बस स्टँड चौकाला अखेर सावित्रीआई फुले यांचे नाव

0
68

पोंभूर्णा येथील बस स्थानक चौक चे नामकरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नामकरण करण्यात यावे यासाठी भुजंग ढोले यांनी १६ ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाला अखिल भारतीय माळी महासंघ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद भूमिपुत्र ब्रिगेड माळी समाज संघटना काँग्रेस, बौद्ध समाज मंडळ, वंचित बहुजन आघडी, मनसे शहरातील इतर विविध सामाजिक सर्व ओबीसी, बहुजन आणि व्यापारी संघटनांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला. भूमिपुत्र ब्रिगेडच्या सर्वेसर्वा आणि काँग्रेस नेत्या डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी उपोषण स्थळी जाऊन साखळी उपोषणाची घोषणा करून जाहीर पाठिंबा दिला. दि. २० ऑगस्ट रोजी नामकरण लढ्याला यश मिळाले. नगर पंचायत प्रशासनाने अधिकृतपने बस स्टँड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीआई फुले असे नाव जाहीर केले.उपोषण स्थळी येऊन भुजंग ढोले यांना आणि इतर उपोषणकर्त्यांना ज्येष्ठ कार्यकर्ते गुलाब जी गुरनुले डॉ. अभिलाषाताई गावतुरे , जिल्हा शिवसेनाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ लोणबले , पोंभुर्णा माळी समाज अध्यक्ष सद्गुरु ढोले नांदुभाऊ नागरकरआशिष कावटवार इत्यादींनी सरबत पाजुन उपोषणाची सांगता केली.भुजंग ढोले आणि सर्व उपस्थित मानायवरांच्या हस्ते असंख्य बहुजन समाज बांधवांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण करण्यात आले.पोंभूर्णा येथील बस स्थानक चौक चे नामकरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नामकरण करण्यात यावे यामागचा इतिहास

1. 2016 ला क्रांतीज्योती सावित्री आई फुले असे चौकाला नामकरण करून जनतेद्वारे फलक लावण्यात आला

2. 2021 मध्ये बहुजन समाज व सर्व समाज तसेच राजकीय पक्ष यांनी नाव द्यावे अशी भूमिका घेऊन आंदोलन केले होते.

याच आंदोलनाची पुढची पायरी म्हणजे 05 ऑगस्टला स्थानिक प्रशासनाला अल्टीमेटम देण्यात आले होते. मात्र प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे अल्टीमेटम मध्ये दिलेल्या आंदोलनाच्या इशारानुसार 16 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण भुजंग ढोले यांनी सुरू केले .

आंदोलनाचा घटनाक्रम

पहिला दिवस –

रैली व उपोषण

16 ऑगस्ट रोजी महात्मा फुले चौक ते मागणीतील क्रांतीज्योती सावित्रीआई फुले चौक दरम्यान रॅली काढण्यात आली व दुपारी 03:00 वाजता उपोषणास सुरुवात करण्यात आली त्यानंतर लगेचच उपोषण स्थळी डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी भेट दिली.

दिवस दुसरा – विविध संघटनेचा पाठींबा व साखळी उपोषण

भुजंग ढोले यांनी चालू केलेल्या उपोषणाला विविध संघटनाचा पाठिंबा उपोषित स्थळी भेट देऊन

संघटनेचा पाठिंबा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून भूमिपुत्र ब्रिगेड तर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले यामध्ये श्रीकांत शेंडे यांच्याद्वारे उपोषण करण्यात आले.अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.सचिन भेदे सोबत शिष्टमंडळाने दिली भेट यामध्ये ऍड.प्रशांत सोनुले , प्रा. माधव सद्गुरु ढोले यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी श्री जाधव यांच्याशी चर्चा करून डॉ.भेदे यांनी मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

दिवस तिसरा :- 18 ऑगस्ट

पालकमंत्र्यांनी फिरवली पाठ

क्षेत्राचे आमदार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रमात उपस्थित दर्शवली मात्र उपोषण स्थळी भेट न देतात गेले असा आरोप आंदोलन कर्ते यांनी केला . ⁠साखळी उपोषणामध्ये दुसऱ्या दिवशी गौरव ठाकरे व दयानंद गुरनुले यांनी उपोषण केले.

दिवस चौथा 19 ऑगस्ट

पोंभूर्णा शहर कडकडीत बंद

आंदोलनाला पाठिंबा म्हनुन सर्व व्यापारी संघटनाचा जाहीर पाठिंबा व संपूर्ण शहर कडकडीत बंद पाळण्यात आला.

उपोषण स्थळी माळी समाजाच्या नगरसेविका यांनी भेट दिली तसेच सत्ता पक्षातील सर्व नगरसेवकांनी उपोषण मंडपी भेट देऊन उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले की, दिनांक 20 ऑगस्ट 2024 ला सकाळी 11:00 वाजेपर्यंत चौकाला नाव देण्याचा ठराव मंजूर करू.साखळी उपोषणात रामदास ठाकरे व सचिन आदे यांनी उपोषण केले.

पाचवा दिवस 20 ऑगस्ट

लढा यशस्वी

दुपारी एक वाजता शहरातील मुख्य बस स्टँड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीआई फुले असे नाव देऊन असंख्य बहुजन समाज बांधवांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण करण्यात आले.

Previous articleवाघाच्या हमल्यात चिचाळा येथील शेळी चालणारा ठार
Next articleचिचोली आणि कढोली येथे भूमिपुत्र ब्रिगेड शाखा उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here