वाघाच्या हमल्यात चिचाळा येथील शेळी चालणारा ठार

0
85

 

(चीचपल्ली वन परिक्षेत्रातील घटना )

मूल तालुक्यातील चिचाळा येथील शेळी पालनकर्ता मुनीम रतीराम गोलावार वय ४१ वर्ष हे काल वन परिक्षेत्र चीचपल्ली, उपक्षेत्र मूल येथील कक्ष क्रमांक ७५२ मध्ये शेळ्या चराईसाठी गेले असता वाघाच्या हमल्यात ठार झाल्याची घटना उघडकीस आली. ही माहिती काल सायंकाळी उशीरा मीळाल्याने आणि शेळ्या चारनारा घरी न आल्यामुळे श्री प्रशांत खाडे विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व प्रियांका वेलमे वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली यांचे आदेशानुसार आज सकाळी मूल चे क्षेत्र सहाय्यक मस्के, वनरक्षक सूधिर ठाकुर,पवन येसाम्बरे,शितल चौधरी, शुभांगी गुरनुले,अतीशिघ्र कृती दल चंद्रपूर चे कर्मचारी तथा संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार,दिनेश खेवले, अंकुश वाणी, रीतेश पीजदूरकर, प्रतीक लेनगुरे,हौशीक मंगर, यांनी मिळून शोध मोहीम राबवली तेव्हा जंगलात त्याच्या मृतदेह मीळाला.वनविभाग व पोलीस प्रशासना मार्फत घटना स्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले..

मृतकाच्या पत्नीला वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका आर.वेलमे , यांचे हस्ते ५०००० रूपये तात्काळ मदत म्हणून देण्यात आली.यावेळी पि.डब्लू.पडवे, क्षेत्र सहाय्यक केळझर, पि.डी.खनके क्षेत्र सहाय्यक महादवाडी, उमेशसिंह झिरे संजीवन पर्यावरण संस्था,मूल वनरक्षक आर.जे.गुरनुले जानाळा, व मृतकाचे बरेच नातेवाईक उपस्थित होते.

विशेष म्हणजे या परिसरामध्ये 10 आगस्ट ला सुध्दा केळझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे वय 60 वर्ष या इसमाला वन परिक्षेत्र चीचपाल्ली, उपक्षेत्र केळझर येथील कक्ष क्रमांक 431 मध्ये गुरे चराईसाठी गेले असता वाघाच्या हमल्यात ठार झाल्याची घटना घडली होती.

Previous articleपोंभुर्णा शहरातील बसस्टॅण्ड चौकाला क्रांतिज्योती सावित्रीआई फुले नाव द्या अन्यथा आंदोलन तीव्र करू
Next articleपोंभुरणा वासीयांच्या आंदोलनापुढे अखेर प्रशासन नमले जुना बस स्टँड चौकाला अखेर सावित्रीआई फुले यांचे नाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here