गडीसुरला येथील मामा तलावाचे पाणी शेतात घुसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान तलावातील पाणी सोडून शेतातील पाणी रिते करून द्या भूमिपुत्र ब्रिगेडची मागणी

0
141

 

गडीसुरला येथील मामा तलाव सर्वे नंबर 91 तलाव गडेश्वरीला यांच्या पाळीची उंची वाढवल्यामुळे तलावाच्या पोटातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून त्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे तलावाच्या बांधकामांमध्ये पाळीची उंची वाढवल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून तळ्याच्या पोटातील सर्व शेत्या पूर्णपणे बुडालेले आहेत आम्हाला त्या रोहिणी करता खाली करून द्यावेत अशी विनंती शेतकरी करीत आहेत पण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे जर प्रशासन शेती खाली करून देत नसेल तर त्यांनी किमान नुकसान भरपाई तरी शेतकऱ्यांना द्यावी असे निवेदन सुद्धा शेतकऱ्यांनी दिलेला आहे भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका आणि काँग्रेस नेत्या डॉक्टर अभिलाषा ताई गवतुरे यांनी काल या शेतांची पाहणी केली आणि बंडू मोहरले देविदास शेंडे भीमराव डोरलीकर आणि धिरदेव डोले या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले मामा तलावांच्या बाबतीमध्ये प्रशासनाचे उदासीन धोरण आणि शेतकरी विरोधी भूमिका हा जिल्ह्यामध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे प्रशासनाची भूमिका ही शेतकऱ्यांच्या हिताची असली पाहिजे आणि म्हणून ज्या समस्या प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांसमोर उभा झालेले आहे त्यांची निराकरण लवकरात लवकर करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांनी दिला आहे.

Previous articleसातबहिणी डोंगर (पेरजागड) हजारों पर्यटकांचे जीव आले धोक्यात पोलिसांनी सजगतेने काढले सुरक्षित बाहेर
Next articleकलकत्त्याच्या नराधमाला फाशी द्या या मागणीसाठी चंद्रपुरातील शेकडो डॉक्टर उतरले रस्त्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here