सातबहिणी डोंगर (पेरजागड) हजारों पर्यटकांचे जीव आले धोक्यात पोलिसांनी सजगतेने काढले सुरक्षित बाहेर

0
1186

 

(परिसरात झालेल्या बेधुंद पावसाने सात बहिणी डोंगर परिसरात अडकले होते हजारो पर्यटक.)

 

तळोधी (बा.)

नागभिड तालुक्यातील प्रसिद्ध सातबहिणी (पेरजागड) डोंगर पर्यटकांसाठी सध्या पर्वणीच ठरत आहे. मात्र निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या स्थळावर १५ ऑगस्ट असल्याने सात ते आठ हजार पर्यटकांनी भेट दिली. दरम्यान अचानक आज ३ वाजता पासुन या परिसरात जोरदार पाऊसाने सुरुवात केली. अन् पाहता-पाहता डोंगराच्या सभोवताल आणि दोन कि.मी. अंतरावर असलेल्या सोनापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नाल्याला पुर आला. आणी दोन ते तिन हजार पर्यटक सात बहिणी डोंगर पायथ्याशी अडकून पडले आणि पाऊस सुरूच असल्यामुळे रात्र अंधार होत असल्यामुळे, व परिसरामध्ये वाघ, बिबट, अस्वल सारखे हिस्त्र प्राण्यांचे दाट वावर असल्याने सर्वांचे जीव धोक्यात आले. घटनेची माहिती प्रशासनाला मिळतात पोलिस विभाग, वनविभाग हे घटनास्थळीं दाखल होवून अडकलेल्या काही युवक पर्यटकांना सोबत घेत पर्यटकांना पुराचे पाण्यातुन रात्री उशिरापर्यंत ही मोहीम राबवत परिस्थितीवर नियंत्रण ठेवून सहकार्य केल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही व मोठी दुर्घटना टळल्याचे बोलल्या जात आहे.

विशेष म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी सारख्या राष्ट्रीय सुट्टीच्या वेळेस हजारो युवक युवती पर्यटनाकरिता अशा पर्यटन स्थळी भेट देतात. मात्र यावेळी पर्यटन स्थळ सांभाळणारी समिती आधीच कोणतीही उपाययोजना व सुरक्षेचे साधन उपलब्ध ठेवत नाही. नंतर अशा पद्धतीच्या प्रशासनाची तारांबळ उडवणाऱ्या घटना घडतात. विशेष

म्हणजे काल या परिसरात लाखो युवक युवती घोडाझरी सात बहिणी डोंगर, मुक्ताई धबधबा, आसोला मेंढा, नलेश्वर बांध, अशा ठिकाणी भेट द्यायला आले. त्यांनी रस्त्याने दुचाकी किंवा चार चाकी वाहन चालवताना त्यांची जी बेधुंद स्पीड होती त्यामुळे परिसरामध्ये अनेक लोकांचे अपघात झाले. तळोधी- गोविंदपुर- चिमूर रस्त्यावरच दहा ते बारा दुचाकी वाहनांचे अपघात झाल्याचे लोकांचे म्हणणे असून यामध्ये कित्येक लोक गंभीर जख्मी झाले. गडचिरोलीच्या मुलांपैकी एकाचा पाय तुटला मात्र त्याचे मित्र त्याला अपघात स्थळीच ठेवून पडून गेल्याचेही बोलले जात आहे. “त्यामुळे या दिवशी असे पर्यटन स्थळ जे धोकादायक आणि जंगलाचे मध्ये आहेत पोलीस, वनविभाग, व महसूल यांच्या संयुक्त पने प्रशासनाने बंदच ठेवावे.” असे काही वन्यजीव संस्था व पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.तळोधी बा.पोलीस निरीक्षक अजित सिंग देवरे, व वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात हे कार्य सुरक्षित पार पाडण्यात आले.

Previous article15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी तळोधी ग्रामपंचायत तर्फे स्वाब संस्थेचे सत्कार
Next articleगडीसुरला येथील मामा तलावाचे पाणी शेतात घुसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान तलावातील पाणी सोडून शेतातील पाणी रिते करून द्या भूमिपुत्र ब्रिगेडची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here