15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी तळोधी ग्रामपंचायत तर्फे स्वाब संस्थेचे सत्कार

0
33

 

(तळोधी बाळापूर ग्रामपंचायत च्या वतीने स्वाब संस्थेच्या बचाव पथकाचे 23 सदस्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.)

तळोधी (बा.):

सर्वीकडे 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतानाच तळोधी मध्येही ग्रामपंचायत च्या वतीने मोठ्या उत्साहात हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळेस परिसरात पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात शासकीय यंत्रणेला व परिसरातील जनतेला सुद्धा नैसर्गिक आपत्तीचे वेळी किंवा कोणत्याही कार्यात पर्यावरण संवर्धनासाठी झटणारी वृक्षारोपण, जंगल परिसरातील धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ, तलाव, नदी , रस्ते या ठिकाणी सतत प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छतेचा अभियान राबवणारी, सतत कोणत्याही शासकीय, अशासकीय यंत्रणेला झाडांचा पुरवठा करून वृक्ष लागवड करण्यास मदत, साप किंवा कोनत्या ही संकटग्रस्त वन्यजीव, पुरपरिस्थीती किंवा रस्त्यावरील अपघात, जंगलातील अपघात, असो पोलीस विभाग, वन विभाग असो की वैयक्तिक लोकांना सुद्धा मदतीचा हात देत सतत निस्वार्थ कार्य करणाऱ्या स्वाब संस्थेचे कार्य लक्षात घेत तळोधी ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेश घिये यांच्या संकल्पनेतून आज तळोधी ग्रामपंचायत च्या वतीने संस्थेच्या बचाव पथकातील 23 सदस्यांचा सरपंच्या सौ.कल्पना मस्के, उपसरपंच राजेशजी घिये व ग्रामपंचायतच्या संपूर्ण सदस्यांचे हस्ते प्रत्येकी सदस्यांचे व्यक्तिगत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी लोक विद्यालय चे शिक्षक संतोष नन्नावार जिल्हा परिषद चे शिक्षक खुशालजी मदनकर सर, महात्मा फुले कॉलेजचे उपप्राध्यापक बुलबुले सर तथा महात्मा फुले कॉलेजमधून विज्ञान शाखा मध्ये 86.50 टक्केवारी घेत प्रथम येणाऱ्या कुमारी संजना दिलीप मदनकर या विद्यार्थीनी यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

“यावेळी संस्थेच्या निस्वार्थ कार्याबद्दल स्वाब संस्था व सदस्यांना मिळालेला हा मान खरोखरच प्रेरणादायी असल्याचे, व या केलेल्या सत्कार बद्दल ग्रामपंचायत तळोधी बाळापूरचे आभार संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी मानले.

गावातील मुख्य ध्वजा रोहन कु.संजना दिलीप मदनकर, यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच्या कल्पना ताई मस्के,उप सरपंच राजेश भाऊ घिये सदस्य सुदाकरजी कामडी सदस्य,नरेंद्र खोब्रागडे सदस्य, जिवेश सयाम सदस्य, सोनू नंदनवार सदस्य, सर्व सदस्य तथा हजारो विध्यार्थी पालक, ग्रामपंचायत कर्मचारी वृंध उपस्थित होते.

Previous articleसर्प आणि अंधश्रद्धा: या विषयावर महात्मा फुले विद्यालयात शैक्षणिक कार्यशाळा
Next articleसातबहिणी डोंगर (पेरजागड) हजारों पर्यटकांचे जीव आले धोक्यात पोलिसांनी सजगतेने काढले सुरक्षित बाहेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here