तळोधी बा वार्ताहर :-नागभीड तालुक्यातील तळोधी पोलीस स्टेशन अतंर्गत येतं असलेल्या आकापूर ते बालापूर या रस्त्यावरील रेल्वे रुळ क्रास करित असतांना विश्वनाथ दुधकुरे (वय ७३ वर्षं) सोनापूर (तुकुम) ह्या इसमाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना दि. 14 आगस्ट बुरवारला १२.३० वाजताचे दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार बालापूर ते आलेवाही दरम्यान आकापूर गावाजवळुन चंद्रपूर – गोंदिया रेल्वेलाईन आहे. रेल्वे लाईन क्रासिंग करिता आकापूर- डोरली रेल्वे बोगद्या असुन या बोगद्यात पाणी साचून असते. त्यामुळें बालापूर, आकापूर, आलेवाही, या रस्त्याने जाणारे अनेक वाटसरू बोगदा सोडून रेल्वे क्रासिंग करून ये-जा करत असतात. दरम्यान आज सोनापूर (तुकुम) येथिल इसम विश्वनाथ दुधकुरे हा इसम रेल्वेक्रासिंग करतांना आज १२.३० वाजताचे दरम्यान गोंदिया कडुन चंद्रपूर कडे जाणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने जागिच मूत्यू झाला.मृतक ईसमाला शव विच्छेदनासाठी ग्रामिन रुग्णालय नागभीड इथे पाठविण्यात आले,पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजितसिंग देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.ए.स.आय लांबट,ए.स आय भाणारकर हे करीत आहेत.
बोगद्याचे बांधकाम सदोष असल्याने येथे पाणी साचतो व त्यामुळें या रस्त्याने जाणारे प्रवासी रेल्वेक्रासिंग करून प्रवास करित असल्यामुळे या बोगद्याची त्वरीत दुरुस्ती करावे असी मागणी नागरिकांनी केली आहे.