मुल तालुक्यातील टेकाडी तसेच चीतेगावं या गावात शिवसेनेच्या भगवा सप्ताहाचे औचित्य साधून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षवाढीसाठी व गावकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांचे गावकऱ्यांकडून पुष्पवर्षाव करून जोरदार स्वागत करण्यात आले.सदैव अडचणीत मदतीला धावून येणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणून संदिपभाऊ गिऱ्हे यांची ओळख मुल तालुक्यातील गावा गावात मिळत असलेल्या प्रतिसाद बघता पाहायला मिळत आहे.संंदिपभाऊ गिऱ्हे यांनी अगदी कमी वेळात जनसामान्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर काम करीत असल्याने थोरा- मोठ्यांपासून, महिलांचीही त्यांना मोठी साथ लाभत आहे.बेरोजगारीचे प्रश्न असो,कृषीचे व शेतकऱ्यांचे प्रश्न असो, रोजगाराचे प्रश्न असो शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांनी नेहमीच पुढाकार घेतला.आणि सदैव धावून जात असल्याने हक्काचा माणूस म्हणून संदिपभाऊ गिऱ्हे यांंची नविन ओळख बल्लारपूर विधानसभेत पाहायला मिळत आहे.जनसामान्याची सेवा करता यावी हा मानस ठेवून राजकारण २० टक्के व समाजकारण ८० टक्के हे शिवसेनेचे ब्रिद आपल्या कार्यातून व्यक्त करत काम करणारे सदिपभाऊ गिऱ्हे लोकांच्या मना मनात घर करीत आहेत.याचीच प्रचिती मुल तालुक्यातील टेकाडी या गावातील गावकऱ्यांचा उदंड प्रतिसाद बघता पाहायला मिळत आहे.गावातील नागरिक जो विश्वास माझ्यावर दाखवत आहेत.त्याचा ऋणी मी सदैव राहीन मी राजकारणात असलो किंवा नसलो तरी मी तुमच्या सुखदुःखात सदैव राहिन असा विश्वासही संदिप गिऱ्हे यांनी गावकऱ्यांकडून मिळालेल्या स्वागत समारंभाच्या वेळी व्यक्त केला.
यावेळी तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार,राजू ठाकरे,महेश चौधरी,सूनिल काळे,ओमदास मोहुर्ले,बादल करपे आदी पदाधिकारी व टेकाडी,चितेगाव येथील सर्व सन्माननीय नागरिक यांची उपस्थिती होती.