चंद्रपूर :- डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात स्थापन झालेल्या भूमिपुत्र ब्रिगेड या संघटनेच्या ‘गाव तिथे शाखा’ व ‘सर्व समाज जोडो’ या अभियानांतर्गत चिमढा, मूल, ताडाळा, हळदी, भेजगाव, येसगाव, गडीसुर्ला, बेंबाळ अश्या तब्बल आठ गावात एकाच दिवशी भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांच्या संकल्पनेतून सामाजिक विकासाच्या हेतूने एक वेचारिक चळवळ म्हणून भूमिपत्र ब्रिगेडला मूर्त रूप मिळाले. डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत घेतला आहे. डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भूमिपुत्र ब्रिगेड मागील एक दशकाहून अधिक काळापासून समाजातील गरीब, शोषित, वंचित लोकांच्या हाक्कासाठी आणि विकासाठी निरंतर लढत आहे.
शेतकऱ्यांसाठी लढा: शेतकऱ्यांचे पिक विमा, कर्जमाफी, आधारभूत किमतीत (एमएसपी), शेती उपयोगी अवजारांवर सबसिडी, रासायनिक खात्ताची सबसिडी व पुरसा साठ, ओला आणि सुका दुष्काळ नुकसान भरपाई, वन विभाग – शेतकरी संघर्ष, मनुष्य – वन्यप्राणी संघर्ष यांसारख्या विविध प्रश्नांसाठी लढत आहे.
वैद्यकीय क्षेत्रामधील योगदान: मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरीब गरजू रुग्णांना वैदकीय सेवा
कामगारांसाठी योगदान: सफाई कर्मचारी, पाणीपुरवठा मजूर, ST कामगार, हॉटेल मधील कामगार, प्रकल्प ग्रस्तांना नियमित सेवेत सामवून घेण्यासाठी अशा संघटीत आणि संघटीत कामगारांच्या वेतन, मानधन आणि इतर मांगन्यांसाठी अनेक आंदोलने करून न्याय मिळवून देत आहे.
शैक्षणिक क्षेत्र: गाव तिथे वाचनालय, गुणवत विध्यार्थांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांसाठी नियमित ST बस, सरकारी शाळा वाचवा अभियान, आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थांसाठी नियमित विद्यावेतन, तरुणाई चुकीच्या मार्गाने भरकटू नये म्हणून ‘री-रूट’ कार्यक्रम.
“भूमिपुत्र ब्रिगेड आदिवासींच्या जल जमीन आणि जंगल आंदोलनात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी राहली आहे. राजकीय क्षेत्रामध्ये पुरोगामी शक्तींना साथ देऊन समाजाच्या सर्वांगीण विकासाठी झटत राहील आणि हेच भूमिपुत्र ब्रिगेडचे ध्येय आहे” असे प्रतिपादन यावेळी मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी केले.
फलक अनावरण यात्रेचे गावकऱ्यांनी ताफ्याचे जंगी स्वागत केले. फलक अनावरण यात्रेतील गाड्यांचा ताफा पाहून डॉ. अभिलाषाताई गावतुरे ह्यांनी प्रचाराचे रनशिंग फुंकले की काय? अशी एकंदरीत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याप्रसंगीत गावातील गुणवंताचाही सत्कार करण्यात आला.
डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नवनियुक्त चिमढा अध्यक्षपदी गुरुदास दासरवार, गाडीसुर्ला अनिल भाऊ निकुरे, भेजगाव विवेकानंद उराडे, ताडाळा योगेश भाऊ चौधरी, हळदी प्रमोद भाऊ चलाख, येसगाव संजय गुरनुले, बेंबाळ मनोज चटारे यांची शाखांच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. “समाज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये भूमिपुत्र ब्रिगेडच्या शाखा सिंहाचा वाटा उचलतील” असे यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉ. समीर कदम यांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी भूमिपुत्र ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ. समीर कदम, डॉ. राकेश गावतुरे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मुसळे, प्रवक्ते ऍड. प्रशांत सोनुले, रुपम निमगडे, सोमेश पेंदाम, रामभाऊ महाडोळे, विजय लोनबले, दिपक वाढई, मुल शहराध्यक्ष नितेश मॅकलवार, विक्रम गुरनुले, राकेश मोहुर्ले, नितेश म्याकलवार, संतोष चिताडे, अनिल कोडापे, रोहित निकुरे, प्रदीप वाढई, मनिष मोहुर्ले, शामराव शेंडे, संजय चौधरी, सुनील कावळे पंकज पुल्लावार, प्रमोद चिंतावार, सचिन आंबेकर, योगेश लुनगुरे, ओमदेव मोहुर्ले, संदीप शेंडे, सुधीर तोडासे, आशिष सुखदेव आणि शेकडो कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.