तालुक्यातील व पोंभुर्णा वनपरिक्षेत्रातील भंजाळी येथील शेतकरी मनीष भांडेकर यांचे शेतात रोवन्याचे काम सुरू असतांना काही महिलांना शेताच्या बांधावर एक भलामोठा अजगर साप दिसला. त्यांनी ही माहिती शेतमालकाला दिली व शेतमालकाने तात्काळ संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे यांचेशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच भंजाळी हे गाव पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात येत असल्याने ही माहिती वनरक्षक विनोद कस्तूरे यांना देण्यात आली. व संजिवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे यांनी संस्थेचे सदस्य अंकुश वाणी यांना सोबत घेऊन शेतातील अंदाजे साडेबारा फुट लांबीच्या व तीस कीलोच्या वजनाचे अजगराला स्थानिक दोन युवकांच्या मदतीने पकडण्यात आले.
अजगराला पकडुन सुरक्षित ठिकाणी निसर्ग मुक्त करण्यात आले. शेतकरी आणि महिला मजुरांना भयमुक्त केल्यामुळे त्यांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांचे आभार मानले.