वाघाच्या हमल्यात गुराखी ठार

0
51

 

यश कायरकर.

वन परिक्षेत्र चीचपाल्ली, उपक्षेत्र केळझर येथील कक्ष क्रमांक 431 मध्ये केळझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे वय 60 वर्ष हे काल गुरे चराईसाठी गेले असता त्याला वाघाने हल्ला करून ठार केले. मात्र गुराखी घरी परत न आल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध करून वन विभागाला कळविले मात्र व रात्री उशीर झाल्यामुळे मृतदेह शोधता आला नाही. आज सकाळी वनविभागाने शोध मोहीम राबवली तेव्हा जंगलात त्याच्या मृतदेह मीळाला. वनविभाग व पोलीस प्रशासना मार्फत घटना स्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

मृतक गुराखी याच्या पत्नीला प्रियंका आर.वेलमे , वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली यांचे हस्ते ३०००० रूपये तात्काळ मदत म्हणून देण्यात आली.यावेळी पि.डब्लू.पडवे, क्षेत्र सहाय्यक केळझर, पि.डी.खनके क्षेत्र सहाय्यक महादवाडी, उमेशसिंह झिरे संजीवन पर्यावरण संस्था,मूल एम.आर.वाघमारे वनरक्षक सांडाळा,आर.जे.गुरनुले वनरक्षक जानाळा, शितल बेंदले वनरक्षक सुशी, स्वप्नील आक्केवार व मृतकाचे बरेच नातेवाईक उपस्थित होते.

Previous articleमुल व पोभुर्णा तालुक्यामधील 15 गावा तील मेंढपाळ यांना त्यांच्या गायी चारण्यासाठी राखीव जागा द्या अन्यथा गोमातेच्या चाऱ्या साठी तिव्र आंदोलन…डॉक्टर अभिलाषा गावतुरे
Next articleभावी नगराध्यक्ष अशी उपमा देत मित्रांनी केला वाढदिवस साजरा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here