पोलिस स्टेशन तळोधी(बा.) अतंर्गत वाढोणा येथिल समाजसेवा विद्यालयातील दहाव्या वर्गातील शिकत असलेल्या विद्यार्थ्यीनिचा येथिलच एका शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना आज उघडकीस आली असुन पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर तळोधी पोलिस स्टेशन अंतर्गत वाढोणा येथिल समाजसेवा विद्यालयातील इयत्ता दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 7 आगस्ट 2024 ला विद्यालयातच दुपारचे सुट्टी मधे आपल्या मैत्री सोबत ग्राउंडवर उभी असताना सदर विद्यार्थ्यांनीला विज्ञान विषयाचा नोटबुक तपासणीसाठी शाळेतील वर्ग कार्यालय खोलीमध्ये बोलावून अश्लिल भाषेत बोलल व विनयभंग शाळेतील एका शिक्षकाने केला.
याबाबतची तक्रार त्यादिवशी शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी दि. 8 ऑगस्ट ला मुलींनी विद्यालयाचे मुख्याध्यापकांकडे केली. मात्र मुख्याध्यापकांनी सदर घटनेची तक्रार पोलिस स्टेशनला देण्यांत यावे असा सल्ला दिला. त्यामुळे घटनेची तक्रार मुलीच्या आई वडील घरी उपस्थित नसल्यामुळे आजोबाला घेऊन मुलीने दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी आज तळोधी पोलिस स्टेशन ला तक्रार दिली त्या अनुषंगाने आरोपी शिक्षक रुपेश गुलाबराव डोर्लिकर (वय 42 वर्ष) याला ताब्यात घेण्यांत आले असुन अपराध क्र. 123/2024 पोस्को अंतर्गत कलम 75(2)/79, सह 8 व 12 , नुसार कारवाई करण्यात आली.
घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली सा.पो.नि. अजितसिंग देवरे करित आहेत. तर परिसरातील चर्चेमुळे शाळेतील आणखी काही विद्यार्थीनीं सोबत अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत का ? याचाही गांभीर्याने तपास तळोधी पोलीस करीत आहेत.