मूल शहरातील अनेक युवकांचा शिवसेना उ.बा.ठा. पक्ष्यात प्रवेश

0
194
  1.  मूल :- संपर्क प्रमुख मान.प्रशांत दादा कदम साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत श्री.बादल करपे समवेत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश ज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस होणारा बदल व सध्याची परिस्थिती बघता बल्लारपूर विधान सभेत युवकांचा कल शिवसेना ठाकरे गटाकडे वाढतच आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे यांचे कार्य बल्लारपूर मुल विधान सभेत गुंजत आहे.आणि त्याच कार्याची दखल घेत मुल शहरातील व तालुक्यातील युवकानं मध्ये शिवसेनेची धगधगती मशाल आज पेटत आहे.

मान.पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे विचार सर्व धर्म समभावाचे असुन ८० टक्के समाज कारन आणि २० टक्के राजकरण या विचारावर संदीप भाऊ गीऱ्हे यांनी नुकताच मुल शहरात भव्य दिव्य रोजगार मेळावा घेऊन अनेक युवकांच्या हाती रोजगाराची मशाल हातात दिली म्हणून अनेक युवकांचा कल मात्र शिवसेना उबाठा कड़े वळून राहिला आहे.

याच विचाराची मशाल घेऊन जय भवानी जय शिवाजी च्या जय घोश्यात मुल शरातील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते तथा बजरंग दल चे तालुका संयोजक बादल करपे यांनी शिवा कुळमेथे लोकेश आगळे समवेत आपल्या असंख्य कार्यकर्ते घेऊन मान.जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम साहेब तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे यांचे हस्ते प्रवेश कार्यक्रम दि.८ आगस्त रोजी विश्राम गृह मुल येथे शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वात पार पडला.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार कृषीउत्पन्न बाजार समिती उपसभापती पोंभुर्णा,युवसेना शहर प्रमुख अमित आयालानी विभाग प्रमुख ऋतिक मेश्राम आणि असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Previous articleवाढोणा येथील समाजसेवा विद्यालयाच्या लिपिकास लाच घेताना अटक
Next articleशिक्षकाकडून शालेय विद्यार्थ्यांनीचा विनयभंग पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल शिक्षकाला अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here