( यश कायरकर )
नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील समाजसेवा विद्यालयाचे लिपिक मोहम्मद अकिल ईश्राईल शेख यांना शाळेतील एका सेवानिवृत्त मुख्याध्यापका कडून पैशाची लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चंद्रपूर यांनी कारवाई केली.
सविस्तर वृत्त याप्रमाणे की वाढोणा येथील समाजसेवा विद्यालयाचे माजी मुख्यध्यापक हे येथुन मुख्याध्यापक पदावरून सन २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाले आहे. तकारदार यांचे सेवानिवृत्ती नंतर सेवाकालावधी दरम्यान जमा असलेले अर्जीत रजेच्या नोंदी प्रमाणीत करण्याकरीता व मुख्याध्यापक यांने कवरींग पत्र लेखाधिकारी शिक्षण विभाग जि.प. चंद्रपुर यांचेकडे पाठविण्याकरीता समाजसेवा विध्यालय वाढोणा येथील कनिष्ठ लिपीक मोहम्मद अकिल इस्राईल शेख, वय ५४ वर्ष यांना संपर्क केला असता त्यांनी वरील काम करून देण्याकरीता १५०००/- रू. लाचेची मागणी केली.
कनिष्ठ लिपीक मोहम्मद अकिल इस्राईल शेख वय ५४ वर्ष यांनी तक्रारदार यांना त्यांचे अर्जीत रजेच्या नोंदी प्रमाणीत करण्याकरीता व मुख्याध्यापक यांचे कवरींग पत्र लेखाधिकारी शिक्षण विभाग जि.प. चंद्रपुर यांचेकडे पाठविण्याचे कामाकरीता १५०००/- रू. लाचेची मागणी केली.
परंतु सेवा निवृत्त मुख्याध्यापक त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार नोंदविली. व सापळा रचून तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणुन ५०००/- रू. आधी स्विकारण्याचे व काम पुर्ण झाल्यानंतर १०,०००/- रू. नंतर स्विकारण्याची तयारी दर्शविली. कारवाईचे आयोजन केले.
व कनिष्ठ लिपीक मोहम्मद अकिल इस्राईल शेख वय ५४ वर्ष यांना त्यावरून आज दि. ०८/०८/२०२४ रोजी लाच रक्कम घेऊन मौजा वाढोणा येथिल चौरस्ता येथील अपना टि स्टॉल अॅन्ड नास्ता पॉईन्ट येथे बोलाविल्याने तेथे लाचेची ५,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारून त्याचे जवळ उभे असलेले श्रीकृष्ण परसराम शेडे वय ३४ वर्ष रा. वाढोणा ता. नागभीड जि. चंद्रपुर यांचेकडे दिले असता तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास कार्य सुरू आहे.
सदरची कार्यवाही श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात तसेच श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक लाप्रवी कार्यालय चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेन्द्र गुरनुले, पोड़वा नरेश नन्नावरे, पो.शी. राकेश जांभुळकर, अमोल सिडाम, मपोशी मेश्रा मोहुर्ले, यांनी केली.