शासनाच्या दडपशाहीला हुकुमशाहीला न जुमानता आदिवासींना त्यांचे हक्क अधिकार मिळवून दिले.
जगन भाऊ येलके यांच्या आंदोलनासमोर शेवटी सरकारला झुकाव लागलं राज्याचे राज्यपाल सि.पी.राधाकृष्णन यांनी जगनभाऊ येलके यांच्या नेतृत्वातील आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन पोभुर्णा तालुक्यातील गावे पेसा अंतर्गत समाविष्ट करणार असल्याचे आश्वासन दिले यामुळे त्यांच्या संघर्षाला यश मिळाले असून येणाऱ्या पिढ्यांना त्यांचा संघर्ष प्रेरणा देत राहील.
मे 2023 मध्ये जगन भाऊ येलके यांनी हजारो आदिवासी बांधवासह रस्त्यावर उतरून त्यांच्या हक्क अधिकाराची लढाई लढली होती.
आदिवासींना परंपरागत वन जमिनीचे पट्टे मिळावेत व पोंभुरणा तालुक्यात पेसा कायदा लागू व्हावा आणि इको पार्क मधील आदिवासी महानायकांच्या प्रतीमांचे विटंबना रोखण्यात यावी याकरिता जगन भाऊ एलके यांच्या नेतृत्वात पोंभुरणा येथे मोठे आंदोलन उभे करण्यात आले होते. रखरखत्या उन्हामध्ये महिला पुरुष आपल्या छोट्या छोट्या बालकांना घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी प्रशासनाकडून त्यांचा अमानवीय छळ करण्यात आला होता. त्यांच्यापर्यंत पिण्याचे पाणी सुद्धा पोचण्यापासून रोखण्यात आले होते. याच आंदोलनात स्थानिक आदिवासी आणि जगन भाऊ एलके यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना खोटा आरोपांमध्ये फसवण्यात आले होते. त्यांच्यावर आरोप पत्र दाखल करण्यात आले पण जगन भाऊ एलके आणि सर्व आदिवासी बांधव मोठ्या हिमतीने या सरकारी छळाला न घाबरता त्यांच्या हक्क अधिकारासाठी लढ्ढले
त्यावेळी जगन भाऊ यांच्या सह 37 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
डॉक्टर अभिलाषा गावतुरे आणि भूमिपुत्र ब्रिगेड यांनी या आंदोलनात सक्रिय पाठिंबा दिला होता आणि सर्व निर्दोष आदिवासींवरील गुन्हे मागे घेण्यात यावे याकरिता शासन दरबारी मागणी केली होती.
पुढे लोकसभा निवडणुकीत सर्व आदिवासी बांधवांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा काढत भाजपाचे स्पेशल पानिपत केले.आता विधानसभेच्या निवडणूकीत भाजपा चे पानिपत होणार या भीतीने सरकार आणि खुद्द राज्यपालांनी पोभुर्णा तालुक्यातील आदिवासींच्या मागण्यांची दखल घेतली असल्याची समाजात चर्चा आहे. या देशाचा आदिवासी बांधव हा कोणत्याही शक्ती पुढे झुकत नाही हे पुन्हा एकदा जगन एलके भाऊ यांच्या नेतृत्वात आदिवासी बांधवांनी दाखवून दिले आहे. पोभुर्णा तालुक्यातील आदिवासी बांधवांचा हा लढ्ढा आता पेसा अंतर्गत गावाचा समावेश करण्या पुर्ती राहीला नसुन हा लढ्ढा आता आदिवासी समाजाच्या अस्थीत्वाचा झाला असल्याने भगवान बिरसा मुंडा, विर शहीद बाबुराव शेडमाके, राणी दुर्गावतीदेवी, तंट्या भिल या महान पुर्वजांची वंशज असलेला आदिवासी समाज या विधानसभेत ही भाजपाचा पानिपत करुन पोभुर्णा आंदोलनात आदिवासी समाजावर अमानवीय गुन्हे दाखल करुन केलेल्या अत्याचाराची परत फेड करून आदिवासी समाज हा या देशाचा मुलनिवासी असल्याचे दाखविणार असल्याची जोरदार चर्चा पोभुर्णा परिसरात आहे.