चंद्रपूर फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर व्दारा संचालित एफ ई एस गर्ल्स महाविद्यालय चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व्दारा भारत सरकार युवा कार्य एंव खेल मंत्रालय व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली च्या परिपत्रका नुसार सायबर क्राईम जनजागृती या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ राजेश चिमनकर, प्रमुख अतिथी मा.मुज्जावर अली सायबर तज्ञ पोलिस विभाग चंद्रपूर मा.अहमद रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे,सह कार्यक्रम प्रा डॉ मेघमाला मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रभारी प्राचार्य डॉ राजेश चिमनकर यांनी माहिती व तंत्रज्ञानामुळे संधी व आव्हाने उभी आहेत याची जाणीव ठेवून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर कराव असे आव्हान केले.मा.मुज्जावर अली यांनी सायबर क्राईम या विषयाला अनुसरून अनेक गून्हयाचे उदाहरणे देत विद्यार्थिनीशी सुसंवाद साधला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे आभार रासेयो सह कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ मेघमाला मेश्राम यांनी मानले कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सतिश आवारी,प्रा.विक्की नैताम, बंडु वरवाडे, सुशील पुप्पलवार, रमेश गुरनुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.