मूल पंचायत समिती येथे मुख्याध्यापकाची कार्यशाळा संपन्न

0
140

 

मूल पंचायत समिती येथे शिक्षण विभागाचे वतीने विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान, मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा हे अभियान यशस्वीरित्या राबविण्याकरीता मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. ?

जिल्हा परिषद चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अश्विनी सोनवणे, गटविकास अधिकारी बी. एच. राठोड, गटशिक्षणाधिकारी सौ. वर्षा पिपरे आदि मान्यवर उपस्थित होते.

शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी विद्यार्थी गुणवता विकास महाअभियान या उपक्रमाची गरज का पडली यावर चर्चात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले. माहूत व हत्तीची गोष्ट सांगून प्रश्ननिर्मिती च्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे. तसेच गोष्ट तयार करण्याचे वं त्यावर आधारीत प्रश्न हा उपक्रम मुख्याध्यापकांनी करण्याचे आवाहन केले. हेरंब कुलकर्णी यांच्या शिक्षण पद्धतीवर अभ्यास झालेल्या चलचित्र दाखवून सर्व मुख्याध्यापकानी अवलोकन करून प्रत्यक्षात आपल्या विद्यार्थ्याच्या विकासात मदत करावी असेही श्रीमती सोनवाने यांनी सांगीतले.

गटशिक्षणाधिकारी श्रीमती पिपरे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 झालेला बदल सांगीतले. यावेळी गटविकास अधिकारी यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचलन आनंद गोंगले साधन व्यक्ती यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद कोरडे केंद्र प्रमुख यांनी मानले

कार्यक्रमास सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधनव्यक्ती, समावेशित तज्ज्ञ, MIS कोआर्डिनेटर व मुख्याध्यापक उपस्थित होते.

Previous articleभूमिपुत्र ब्रिगेडचे राकेश मोहूर्ले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पोशाख  वाटप
Next articleक्रांतीदिनाचे औचित्य साधून ‘अबे पोट्टे हो फ्रेम नितेश कराळे मूल नगरीत’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here