मूल
भूमिपुत्र ब्रिगेड मुल चे राकेश मोहूर्ले यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद विद्यालय , मुल येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय पोशाख वाटप करण्यात आले. राकेश मोहूर्ले यांनी शुभेच्छा बॅनर यावर खर्च न करता वाढदिवसा निमित्त एक नवीन उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद विद्यालय मुल येथे विद्यार्थ्यांनद्र्थ शालेय पोषक वाटप तसेच शाळेचे मुख्याध्यापक नितीन घरोटे यांना शाळेसाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा भेट दिली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले . या अभिनव उपक्रमासाठी भूमिपुत्र ब्रिगेडचे डॉ. राकेश गावतुरे, डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी राकेश मोहुर्ले तसेच भूमिपुत्र ब्रिगेड शाखा मूल चे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विजय लोनबले जिल्हाध्यक्ष महात्मा फुले समता परिषद, भूमिपुत्र ब्रिगेडचे मुल शहराध्यक्ष .नितेश मॅकलवार , काजू खोब्रागडे, पिंटू पिंपळे,किशोर राऊत,सतीश उसेवार ,प्रतिक गुरूनुले , प्रदीप वाढई उपस्थित होते.