तळोधी (बा.) नागभिड तालुक्यातील चिंधिचक गटग्रामपंचायत अतंर्गत चिंधिमाल येथे १ ऑगस्ट ला महसुल पंथरवाडा निमित्ताने महसुल दिन कार्यक्रम साजरा करण्यांत आला.
महसुल दिन कार्यक्रमाच्या सुचना नागभिड तहसिलदार प्रताप वाघमारे यांनी दिल्यानुसार कार्यक्रमाला नायब तहसिलदार भानारकर, सरपंच हरिदास वरठे, युवाजनसेवक जगदिश सडमाके, उपसरपंच प्रदिप समर्थ, महसूल मंडळ अधिकारी सुभाष बोट्टावार, तलाठी विकास मेश्राम, ग्रामसेवक रतन वासे, पत्रकार राहुल रामटेके, समुदाय आरोग्य अधिकारी कांचन कोडापे, आरोग्य सेविका सय्यद,पोलिस पाटील प्रदिप धारणे, सगंनक ऑपरेटर राजू सहारे, ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र माहोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
महसुल दिनाच्या या कार्यक्रमात नायब तहसिलदार भानारकर यांनी महसुल विभागांच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी चिधिमाल येथिल पारधी, बहुरुपी, या भटक्या समाजातील नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्नेहल मडावी, या मुलांचे मधूर मार्गदर्शनाने कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमांचे संचलन महसुल मंडळ अधिकारी सुभाष बोट्टावार यांनी केले. यावेळी महसुल कर्मचारी, तथा गावांतील महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.