कृषी उत्पन्न बाजार समिती मुल तर्फे दिलेल्या शालेय समुदाय भोजनदिन उपक्रमात 400 ते 500 मुलीचासहभाग

0
164

मुल – नवभारत कन्या विद्यालय,मूल येथे समुदाय भोजन दिन उपक्रम शालेय पोषण दिवसाचे औचित्य साधुन दिनांक ३०/०७/२०२४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती,मूलचे सौजन्याने विद्यार्थीनीना मसाला भात व लाडूचे जेवण देण्यांत आले.कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश. रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार,संचालक घनश्याम येनुरकर, किशोर घडसे, सामाजीक कार्यकर्ते संदिप मोहबे, विष्णु सादमवार उपस्थितीत होते. तसेच, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार मॅडम, सहा.शिक्षक विजय सिध्दावार, व शाळेतील शिक्षक व शिक्षीका वृंद उपस्थितीत होते.

शालेय पोषण दिनाचे दिवशी समुदाय भोजनास ४०० ते ५०० विदयार्थीनीने सहभाग घेवून जेवनाचा मनमुराद आनंद घेतला. अशा स्वरूपाचा कार्यक्रम प्रथम राबविल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर हसतमुख आनंदाचे वातावरण दिसून आले.

Previous articleमतदान नोंदणी अभियान सम्पन्न अभिलाषा गावतुरे यांचे आयोजन
Next articleरेल्वेच्या धडकेत  रानगवा ठार बल्लारशा – गोंदिया रेल्वे मार्गावरील तळोधी वनपरिक्षेत्रातील घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here