Home चंद्रपूर मतदान नोंदणी अभियान सम्पन्न अभिलाषा गावतुरे यांचे आयोजन
- चंद्रपूर :- दिनांक 28 जुलै 2024 रोजी डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या माध्यमातून बल्लारपूर येथील बुद्ध नगर वार्डातील गवसीय मजीत चौक येथे मतदान नोंदणी अभियान भर पावसामध्ये घेतल्या गेले यात मोठ्या प्रमाणावर मतदार यादी मध्ये आपले नाम नोंदविले आणि जवळपास 101 मतदारांनी आपले नाव येण्यासाठी नोंदणीकृत केले आपण पाहिले आहे की हजारो मतदारांचे नाव मतदान यादी मधून गहाळ करण्यात आलेले होते. आणि त्यांना आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागले होते. ज्याचा फायदा या निवडणुकीमध्ये लोकशाही विरोधी आणि संविधान विरोधी तत्त्वांना मोठ्या प्रमाणावर झाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये असे होऊ नये आणि जास्तीत जास्त नागरिकांना त्यांच्या मतदानाचा अधिकार बजावता यावा याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या माध्यमातून मतदान नोंदणी अभियान बल्लारपूर मध्ये आणि संपूर्ण विधानसभेमध्ये घेतल्या जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून आज मतदान नोंदणी शिबिर येथे घेण्यात आले. यामध्ये ताहीर हुसेन सय्यद अजीज साजिद शेख अतीक शेख सिराज शेख,बशीर खान मुमताज सिद्दिकी आणि शिवबच्चन राजभर इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
© All Rights Reserved