Mul :- मागील काही दिवसापासून सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे विविध प्रतिष्ठानातील काम करणारे कामगार छत्र्यांच्या अभावामुळे वेळेवर कामावर रुजू होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेता मुलचे किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चिंतलवार यांनी ही समस्या सर्वांच्या मदतीला धावून येणारे माननीय सुधीरभाऊ यांच्यापर्यंत पोहोचविली आणि सुधीर भाऊंनी तात्काळ ही समस्या लक्षात घेऊन प्रतिष्ठानतील वेगवेगळ्या कर्मचारी वर्गासाठी छत्र्यां पाठवून त्यांना एक सुखद भेट वस्तू दिली आहे.त्यामळे समस्त कर्मचारी वर्ग खूप आनंदी झाला आहे.