मूल शहर मध्ये मोठी बाजारपेठ असल्याने इथे अनेक व्यवसाय आहेत. मूल येथील नामवंत कपडा व्यापारी निर्मल साडी सेंटर चे मालक श्री गणेश पडगेलवार यांची कन्या कु. ऋतुज़ा हि या वर्षीच्या सी. ए. ची परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. मूल शहरातील तसेच आर्य वैश्य समाजातूनही ही पहीली आहे जिने सी ए चे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे हिने बीकॉम, आर्टिकलशिप तसेच सी. ए. चे शिक्षण पुणे मध्ये घेतले असून यूनाइटेड स्टेट्स च्या CFE अभ्यासक्रमात यश संपादन केले आहे.
रुतुजा च्या यशामुळे तिला मूल मधील सर्व क्षेत्रातून अभिनंदन देत कौतुक केले जात आहे. ऋतुजा ने आपल्या यशाचे श्रेय तिने आपल्या आई बाबा आणि शिक्षकांना दिले.