बेंबाळचे उदाहरण ताजे असतानाच वीज महावितरण विभागाने विसापूर येथील पाणीपुरवठा विभागाची कापली वीज

0
49

मागील आठवड्यात बेंबाळच्या पाणीपुरवठा विभागाची वीज कापले गेल्याचे उदाहरण ताजे असताना आता विसापुर गावातील पाणीपुरवठा विभागाची विज कापल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव असतो ज्यात ताप, सर्दी, हगवन, उलटी व कॅालरा या सारख्या साथीच्या रोगाने मोठ्या प्रमाणावर लहान मुले मृत्यमुखी पडतात. साथीचे रोग मुख्यतः दुषीत पाणी पिल्यामुळे होत असून पावसाळ्याच्या दिवसात याचा धोका मोठ्या प्रमानावर संभवतो. गोरगरीब जनतेच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये या करिता आरोग्याच्या समस्यांची उत्तमजान असलेल्या डॅाक्टर अभिलाषाताई गावतुरे यांनी बेंबाळ येथे विज पुरवठा खंडीत केलेला प्रश्न उचलून धरत पाणीपुरवठा विभाग व विद्युत महावितरण विभाग यांचे समन्वय घडवून बेंबाळ येथील पाणीपुरवठा सुरळीत केला होता.त्यावेळी पिण्याचे शुध्दपाणी पुरवठा करणे ही शासनाची जबाबदारी असून याकडे दुर्लक्ष केल्या मुळे मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगांचा प्रर्दुभाव होऊन सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ शकते यामुळे शासनाने पाणीपुरवठ्या कडे विशेष लक्ष देऊन सामान्य जनतेला निदान पावसाळ्याच्या दिवसात तरी शुध्द पिण्याचे पाणी मिळेल या कडे विशेष लक्ष देण्याची विनंती केली होती. परंतु काल विसापुर गावातील पाणीपुरवठा विभागाची विज विद्यत महावितरण विभागाने कापल्याने सामान्य जनतेला पावसाळ्यातील रोगराई च्या दिवसात शुध्दपाणी पुरवठा करण्यास शासन गंभीर नसल्याचे दिसुन येत आहे. *सरकारच्या*

*दोन वेगवेगळ्या विभागात समन्वय नाही काय* *आणि वारंवार प्रशासन आपली जबाबदारी झटकून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पिण्यापासून का वंचित ठेवत आहे असा संतप्त सवाल प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांनी केला असून शासना ने ही बाब गंभीरते ने घेऊन विसापुर गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा व पावसाळ्याच्या दिवसात कोणत्या ही गावचा पाणीपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा पिण्याच्या शुध्दपाणी साठी जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा गर्भींत इशार डॅाक्टर अभिलाषाताई गावतुरे यांनी दिला आहे*

प्रशासनाच्या दिरंगाईचा आणि नाकर्तेपणाचा भुर्दंड सामान्य जनतेने आपले आरोग्य व जीव धोक्यात टाकून का भरावा हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.आधीच मुसळधार पाऊसामुळे आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सामान्य जनता हैराण झाली आहे तर दुसरी कडे अतीवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. अश्यास्थितीत पावसाच्या अस्मानी संकटाने शेतकरी व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांना शासनाच्या पाणीपुरवठा विभाग व विज महावितरण विभाग याच्यातील समन्वयाच्या अभावाने विज कपाती सारखे तुघलकी निर्णय घेऊन शासन सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आनत असल्याचे दिसुन येत आहे. शासनाने ऐकीकडे विसापुर गावातील बॅाटनिक्ल गार्डन मध्ये रोशनाई करिता मोठ्या प्रमाणावर अनावश्यक लाईट्स लावून आवश्यकता नसतांना लाखो रूपयाची उधळपट्टी करत आहे तर दुसरी कडे विसापुर गावातील सामान्य जनते करिता पाणीपुरवठा करणाऱ्या विभागाची विज कपात करून सामान्य जनतेचे आरोग्या धोक्यात आनत आहे.त्यामुळे पिण्याचे पाणी या सारख्या मुलभूत समस्ये कडे शासन दुर्लक्ष करून विकासाच्या नावा खाली श्रीमंताच्या चैनी करिता गार्डन व वास्तूनिर्माण करण्यात व्यस्त असल्याची जोरदार चर्चा परिसरातील नागरिकांन मध्ये रंगली आहे.

Previous articleवाघाच्या हमलात नवानगर (सोनूली) येथील महिला ठार   ब्रह्मपुरी वन विभाग मधिल दोन दिवसात दुसरी, तळोदी वनपरिक्षेत्रातील पहिली घटना
Next articleतात्काळ नुकसान भरपाई द्या बेंबाळ वासियांची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here