मंगेश फरपट |
वऱ्हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुरा: दारुड्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना तालुक्यातील जिगाव येथे आज सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली. पतीने पत्नीस धारधार शस्त्राने हत्या करून प्रेत शेतात पुरवले होते. जाईबाई समाधान तायडे (वय ५०) रा. जिगाव असे मृतक महिलेचे नाव आहे.
जिगाव येथील समाधान तायडे हा त्याची पत्नी जाईबाई हीस नेहमी दारुसाठी पैसे मागायचा. त्यातून त्यांचे नेहमीच वाद व्हायचे. यातून त्याने काल पत्नीची हत्या करून शेतात प्रेत पुरवले. मात्र आज सकाळी शेतात जात असताना काही शेतकºयांना दुर्गंधी येवू लागली. तेव्हा त्यांनी पोलिसांना फोन केला. घटनास्थळी नांदुरा पोलिसांनी पोहचून पंचनामा केला. तेव्हा मृतक महिलेची ओळख पटली. पोलिसांनी पतीस अटक केली असून पुढील तपास ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ मनोहर बोरसे, अरुण खुटाफळे तपास करीत आहे.