वाघाच्या हमलात नवानगर (सोनूली) येथील महिला ठार   ब्रह्मपुरी वन विभाग मधिल दोन दिवसात दुसरी, तळोदी वनपरिक्षेत्रातील पहिली घटना

0
157

यश कायरकर (तालुका प्रतिनिधी):

ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्रातील, देवपायली बीटा मधील नवानगर येथील महिला जनाबाई जनार्दन बागडे (51 वर्षे) ही आपल्या शेतामध्ये धानाचा निंदन करायला गेली असता सायंकाळी वाघाच्या हमल्यात ठार झाल्याची घटना घडली.

सविस्तर मृतक जनाबाई बागडे ही महिला आपल्या शेतामध्ये धानाचे निंदन करायला गेली होती. मात्र सायंकाळी महिला घरी न आल्यामुळे परिवारातील लोकांनी शेतावर जाऊन शोधाशोध केली असता महिला सापडली नाही त्याबाबत तात्काळ सूचना वन विभागाला देण्यात आली तेव्हा रात्री जाऊन वनविभागाच्या टीमने शोधाशोध केली मात्र पाऊस सुरू असल्यामुळे महिलेला शोधता आले नाही. सकाळी पाच वाजता पासून पुन्हा वन विभागाने गस्त सुरू केले असता निदर्शनास आले की तिचे शेत हे कक्ष क्रमांक 132 ला लागून रस्त्याच्या कडेला आहे सायंकाळी शेताचे काम आटोपल्यानंतर महिला बाजूला शौचास बसली असता परिसरातील वाघाने अचानक मागून हमला करून कक्ष क्रमांक कक्ष क्रमांक 132 मध्ये घटनास्थळापासून 800 मीटर अंतरावर महिलेचे शव निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे शवविच्छेदन करीता वन विभागाच्या गाडीने नेण्यात आले. यावेळी तळोदीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मृतकाचे परिवाराला 25 हजार रुपये तात्काळ मदत दिली.

विशेष म्हणजे एक दिवसापूर्वी त्याच परिसरात नागभीड वनपरिक्षेत्र मध्ये वाघाने असेच जंगलात असलेल्या एक शेतकरी दोडकु सेंदरे (60 वर्षे) राहणार मिंडाळा याला सुद्धा एक दिवसापूर्वी सायंकाळी पाच वाजता ठार केले होते.

“त्यामुळे या परिसरामध्ये वाघाचा वावर असल्यामुळे लोकांनी सायंकाळी जास्त उशिरापर्यंत एकट्याने जंगलात किंवा जंगलालगतच्या शेतामध्ये राहू नये व बिनाकामाने जंगलात जाऊ नये जेणेकरून कुणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही.” – वन परिक्षेत्र अधिकारी नागभीड व तळोधी यांनी परिसरातील लोकांना दिलेले आहेत. त्यानंतर त्या परिसरात कॅमेरे लावून वाघाचा शोध घेणे सुरू असून संपूर्ण वनविभागाची टिम व स्वाब टीम त्या परिसरामध्ये गस्त घालित असून रस्त्यालगतचे रस्त्यावर आलेले झुडपं कटाई करण्याचा काम सुरू केलेला आहे.

Previous articleतळोधी पोलिसांनी व स्वाब संस्थेने केला रस्त्यावरील चिखल(गाळ) साफ सावरगाव – वाढोणा रस्त्यावर चिखलावरून दिवसभरातून शेकडो वाहनचालकांचा झाला अपघात
Next articleबेंबाळचे उदाहरण ताजे असतानाच वीज महावितरण विभागाने विसापूर येथील पाणीपुरवठा विभागाची कापली वीज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here